एक्स्प्लोर

आंगणेवाडी यात्रेचा मुहूर्त साधत भाजपची जाहीर सभा; सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय म्हणत शक्तिप्रदर्शन करणार

Sindhudurg News : भराडी देवीच्या यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आंगणेवाडीमधील माळरानावर भाजपने भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कोकणतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा (Anganewadi Jatra) 4 फेब्रुवारीला होत आहे. याचं यात्रेचा मुहूर्त साधत भाजप आंगणेवाडीत जाहीर सभा घेणार आहे. भराडी देवीच्या यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आंगणेवाडीमधील माळरानावर भाजपने भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय या टॅगलाईनवर ही जाहीर सभा भाजप घेत असून या सभेदरम्यान शक्तिप्रदर्शन करणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा सी वर्ल्ड या प्रकल्पाला चालना द्यावी, कोकणातील रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी या व्यासपीठावरुन उपमुख्यमंत्र्यांनी ग्वाही द्यावी, अशी मागणी 'आम्ही कोकण'च्या वतीने करण्यात येणार आहे. 

...तर कोकणातील तरुण इथेच स्थिर होतील

सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय या टॅगलाईनवर ही सभा भाजपने आयोजित केली आहे. मालवणमधील सी वर्ल्ड प्रकल्प आणि रिफायनरी झाल्यास कोकणातून मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाणाऱ्या मुलांना रोजगार उपलब्ध होऊन ते याच ठिकाणी स्थिर होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्याने भाजपला ग्रामपंचायतीपासून सर्व निवडणुकांमध्ये भरभरुन दिले. आता भाजपचे सरकार राज्यात आलं असून त्यांनी रोजगार उपलब्ध करुन स्थानिकांना इथेच स्थिर होण्यासाठी संधी द्यावी, असं वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा (Anganewadi Jatra). दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात. राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता भाजप देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आंगणेवाडी जवळील भोगलेवाडी येथील माळरानावर घेण्याच्या तयारीत आहे. भाजपचे अनेक नेते या भव्य सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

नवसाला पावणारी भराडी देवी

मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं. मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.

संबंधित बातमी

Anganewadi Jatra 2023: आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेदिवशीच फडणवीसांची सभा, 4 फेब्रुवारीला होणार सभा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Embed widget