Siddaramaiah : कॉलेजला असताना प्रेम झालं, आंतरजातीय विवाह करायचा होता, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली अधुरी प्रेम कहाणी!
Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जातीवादामुळे त्यांची प्रेम कहानी कशापद्धतीने अपयशी ठरली याबाबत भाष्य केलं आहे. कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जातीवादामुळे त्यांची प्रेम कहानी कशापद्धतीने अपयशी ठरली याबाबत भाष्य केलं आहे. कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिद्धरामय्या यांनी त्यांची अधुरी प्रेम कहाणी सांगितली आहे. कॉलेजला असताना एका मुलीवर प्रेम झालं होतं. मला आंतरजातीय विवाह करायचा होता. मात्र, मुलीने नकार दिला, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
मुलीच्या कुटुंबियांनी आणि मुलीने देखील नकार दिला
सिद्धरामय्या म्हणाले, जेव्हा मी कॉलेजला असताना अभ्यास करत होतो. तेव्हा मला एका मुलीशी प्रेम झालं होतं. मला चुकीचं समजू नका. मी तिच्याशी विवाह करायचा, असा विचार पक्का केला होता. मात्र, मुलीच्या कुटुंबियांनी आणि मुलीने देखील नकार दिला. त्यामुळे आमचा विवाह होऊ शकला नाही. शेवटी माझ्यावर माझ्याच जातीच्या मुलीशी विवाह करण्याची वेळ आली. माझा माझ्या जातीतील मुलीशीच झाला.
आंतरजातीय विवाहांना समर्थन देण्याची सिद्धरामय्यांची गॅरंटी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी बोलताना आंतरजातीय विवाहांना माझे समर्थन असल्याचे म्हटले आहे. शिवाय आमचं सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुणांना सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापुरुषांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आजवर त्यांचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत, असं म्हणत सिद्धरामय्या यांनी खंत देखील व्यक्त केली. जातीवाद दूर करण्याचे दोनच मार्ग आहेत. एक आहे आंतरजातीय विवाह आणि दुसरा आहे की, जातींमध्ये सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरण करणे. त्याआधारेच आपण समाजात समता प्रस्थापित करु शकतो, असंही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या