एक्स्प्लोर

आपल्यासोबत घात नाही, विश्वासघात झालाय; लेकाच्या भाषणातील शब्द ऐकताच भास्कर जाधवांना अश्रू अनावर

उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव पुन्हा एकदा भावनिक झाल्याचं दिसून आलं. मुलगा विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना भास्कर जाधव यांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : राज्यात गेल्या काही महिन्यात चांगल्याच राजकीय घडामोडी घडत असून विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षांतराचे वेधच लागल्याचं दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात नेत्यांचे प्रवेश वाढत आहेत. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटालाही मोठा फटका बसत असून नाशिकमधील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता, कोकणातीलही पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात शिवसेना नेते आणि आमदार भास्कर (Bhaskar jadhav) जाधव यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मुलगा विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना वडिल भास्कर जाधवनांना अश्रू अनावर झाले होते. यापूर्वीही भास्कर जाधव यांना एका मेळाव्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 

उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव पुन्हा एकदा भावनिक झाल्याचं दिसून आलं. मुलगा विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना भास्कर जाधव यांचे डोळे पाणावले, कंठ दाटल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. यावेळी, आपल्यासोबत घात नाही, विश्वासघात झालाय असे मुलगा विक्रांत यांनी म्हणताच भास्कर जाधवांचा कंठ दाटला, त्यांनी समोरील टॉवेलने आपले डोळे पुसले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी भास्कर जाधव यांची साथ सोडल्यानंतर भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षाचा वेळणेश्वर येथे मेळावा होत आहे. या मेळाव्यात भाषण करताना मुलगा विक्रांत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी, मुलाच्या भाषणणावेळी भास्कर जाधव पुन्हा एकदा भावनिक झाले होते. यापूर्वी देखील भास्कर जाधव शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती, महाविकास आघाडीत मंत्रिपदाची संधी नाकारल्याने भास्कर जाधव नाराज होते. दरम्यान, जाधव यांच्या पक्षांतराची चर्चा जोर धरत असताना, यापूर्वीच्या एका मेळाव्यात त्यांचे डोळे पाणावले होते. 

मोलकरणीची पाठवणी करतानाही अश्रू 

भास्कर जाधव यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे मे महिन्यात लग्न होते, त्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. आपुलकीच्या नात्यांमधून तयार झालेल्या या प्रेमाचा हळवा क्षण पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. तेव्हा, सुप्रियाला बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवांच्याही अश्रूंचा बांध फुटला. 

हेही वाचा

पुण्यातील दलित मुलींच्या मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, ससून रुग्णालयाचा रिपोर्ट लीक, कोथरुड पोलिसांना क्लीनचिट?

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget