Shivajirao Moghe vs Ashok Chavan : नांदेडमधून काँग्रेस उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून येणार, शिवाजीराव मोघेंनी अशोक चव्हाणांविरोधात शड्डू ठोकला
Shivajirao Moghe vs Ashok Chavan Nanded : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेस पक्ष नांदेडमध्ये चांगलाच सक्रिय झालाय. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) यांनी मंगळवारी (दि.20) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
Shivajirao Moghe vs Ashok Chavan Nanded : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेस पक्ष नांदेडमध्ये चांगलाच सक्रिय झालाय. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) यांनी मंगळवारी (दि.20) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बैठक पार पडल्यानंतर त्यांनी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मताने ज्या पाच जागा निवडून येतील त्यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश असेल. नांदेडची जागा काँग्रेसच जिंकेल, असे शिवाजीराव मोघे म्हणाले आहेत.
शिवाजीराव मोघे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वाधिक मताने ज्या पाच जागा निवडून येतील त्यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश असेल, नांदेडच्या जागा काँग्रेस जिंकेल, अशोकराव चव्हाण भाजपात गेल्याने काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही. विनाकारण ते भाजपात गेले असे मिश्किल टीकाही यावेळी मोघे यांनी केली. अशोक चव्हाण ही ताकद नव्हती काँग्रेस ही ताकद आहे, असं म्हणत काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताच राज्यसभेचं बक्षीस
काँग्रेसमध्ये उभं आयुष्य घालवलेल्या नेत्यांनी आत्ता भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिले आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं मोठ नाव आहे. ते केवळ एकदाच नाही तर दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिवाय त्यांचे वडिलही काँग्रेसकडूनच मुख्यमंत्री होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी मंत्रिपदही भूषवली. तरिही वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर चव्हाण काय म्हणाले?
भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) काँग्रेसच्या चुकांचा पाढा वाचला. " काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे कठीण होते. पण कधीतरी हा निर्णय घ्यावाच लागणार होता. कारण निवडणूक ही युद्धासारखी असते. त्यासाठी तयारी करावी लागते. जी काँग्रेसमध्ये सध्यातरी दिसत नाही. काँग्रेसमध्ये ना ताळमेळ आहे ना जिंकण्याची जिद्द आहे. वरिष्ठांमध्येच समन्वयाचा आभाव आहे, काँग्रेस सोडताना मी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो मी हा निर्णय का घेत आहे? हेही सांगितलं, असेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या