एक्स्प्लोर

BJP MNS Alliance : काल आशिष शेलार-राज ठाकरेंची भेट, आज मनसेचे शिलेदार भाजपच्या कार्यक्रमात; भाजप आणि मनसे युतीच्या दिशेने?

Mumbai BJP : मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे हे 'धन्यवाद देवेंद्रजी' या भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

मुंबई: लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. मुंबईचे भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आणि मंगळवारी मनसेचे नेते भाजपच्या कार्यक्रमात दिसले. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे हे 'धन्यवाद देवेंद्रजी' या भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या म्हाडा, एसआरएतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुटल्या. त्यामुळे मुंबई भाजपकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  'धन्यवाद देवेंद्रजी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मनसेच्या नेत्यांनी उपस्थिती लावली.

कोण कुणाला कधी टाळी देतोय समजत नाही

या कार्यक्रमात बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल मी आणि सरदेसाई का आलो? मला प्रवीण दरेकरांनी फोन केला होता. कोण कोणाला काय बोलतो ते कळत नाही, कोण कोणाला कधी टाळी देतं हे देखील कळत नाही. विकास करा म्हटल्यावर मला धडकी भरली. सीडी, ईडी बोलल्यावर धडकी भरते हो. चांगलं काम करणारं सरकार राज्यात असणं आवश्यक आहे आणि आपण उत्तम काम करताय. पुन्हा पुन्हा येणार असं तुम्हीच बोलता ना? तीच संधी पुन्हा मुंबई तुम्हाला देईल. 

मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दोन  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये भाजप आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मनसेला महायुतीत सामील करण्यासाठी दिल्लीतील नेतृत्वाकडूनही विचारमंथन सुरु असल्याची मोठी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, साथ वगैरेचा काही सवाल नाही आम्ही राजकीय मित्र आहोत भेटत असतो. युतीबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर उत्तर देताना शेलार यांनी सांगितलं की, 'मन की चर्चा झाली, जन की बात' झाली. शेलार पुढे म्हणाले की, राजकरणात भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असतात. अद्याप कोणताही राजकीय निर्णय नाही, योग्य वेळी याबाबत चित्र स्पष्ट होईल, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 'देवेंद्रजी म्हणाले आहेत तर, लवकरच चित्र स्पष्ट होईल. सध्या मी मनसेबद्दल काहीच बोलणार नाही, योग्य वेळी यावर निर्णय होईल', असं शेलार यांनी सांगितलं आहे.

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget