Shiv Sena Whip : शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हिपचं उल्लंघन न करण्याचा शिंदे गटाचा इशारा; ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार?
Shiv Sena Whip : शिवसेनेच्या 56 आमदारांनी व्हिपचं उल्लंघन करु नये, अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असं आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. दरम्यान शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होणार का?
Shiv Sena Whip : "शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं, असं वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केलं आहे. प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) त्यासंदर्भात सूचना करतील. 56 आमदारांनी व्हिपचं (Whip) उल्लंघन करु नये. जे उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटातील (Thackeray Group) आमदारांना हा इशारा दिल्याचं समजलं जात आहे.
56 आमदारांमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांचा समावेश होतो. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर सर्व अधिकार शिंदे गटाकडे गेले आहेत. त्यामुळे व्हिप बजावल्यनंतर सर्व आमदारांनी त्याचं पालन करावं. व्हिपचं उल्लंघन केल्यास कारवाई होईल, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनाही अपात्रेची कारवाई करणार : संजय शिरसाट
संजय राऊत यांनी दोन हजार कोटींचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अशा सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आम्हाला उचित वाटत नाही. त्यांना कदाचित कल्पना नसेल की निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्षाची मान्यता दिलेली आहे. म्हणून आजच्या बैठकीत यावरही चर्चा झाली की संजय राऊत यांना अपात्र करण्याची कारवाई निश्चितच आम्ही करणार आहोत, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले
शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होणार का?
मला वाटतं की शिंदे गटाला ठाकरे गटातील आमदारांसाठी व्हिप वापरता येणार नाही, असं कायदेतज्ज्ञ आणि राज्याचे माजी महाधिवक्त श्रीहरी अणे यांनी म्हटलं. "शिवसेना शिंदे गटाची किंवा शिवसेना ठाकरे गटाची या दोन विरुद्ध Entities (संस्था) वेगवेगळे पक्ष आहेत असा निवडणूक आयोगाचा निकाल आहे. मुख्य पक्ष शिंदेंचा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. हा शिंदेंचा पक्ष नव्हे, त्याअर्थी हा सत्ताधारी पक्ष नव्हे, हा वेगळा पक्ष आहे, असा त्याचा अर्थ आहे. जसा भाजपचा व्हिप सेनेवर चालत नाही, सेनेचा व्हिप राष्ट्रवादीवर चालत नाही किंवा दोघांचेही व्हिप काँग्रेसवर चालत नाही तशी स्थिती आहे. कायद्यामध्ये हे दोन भिन्न संस्था आहेत. थोडक्यात माझा तुझ्यावर कंट्रोल असेल तर व्हिपला अर्थ आहे, संबंधच नसेल आणि कायद्यामध्ये संबंध नाही हे जाहीर झालं असेल तर व्हिप लावण्याचा उद्देशच नाही," असं श्रीहरी अणे म्हणाले.
Shiv Sena Whip : शिवसेनेच्या 56 आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं : Pratap Sarnaik