एक्स्प्लोर

...तेव्हा हे तत्त्वज्ञान का सुचलं नाही? अशोक चव्हाणांच्या हातातील पोस्टर पाहून सुषमा अंधारे संतापल्या, थेट प्रश्नांचा भडीमार!

सुषमा अंधारे यांनी अशोक चव्हाण यांचा एक फोटो शेअर करून जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण तुम्हाला हे शोभत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर राज्यभरात संतापाची लाट उसलळी आहे. विरोधकांनी तर अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी करत आंदोलन केलं आहे. शाहांनी राज्यसभेत केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही पडले आहेत. विरोधकांच्या या भूमिकेविरोधात अमित शाहांचा बचाव करण्यासाठी भाजपानेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. असे असतानाच भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या हातातील एका पोस्टचा संदर्भ घेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अंधारे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. 

सुषमा अंधारे यांनी शेअर केला अशोक चव्हाणांचा फोटो

सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी अशोक चव्हाण यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चव्हाण यांच्या हातात एक पोस्टर आहे. या पोस्टवर 'काँग्रेसने किया बाबासाहेब आंबेडकरजी का अपमान. बाबासाहेब आंबेडकरजीको दो बार चुनाव हराया... काँग्रेस माफी मांगो' असे लिहिलेले आहे. याच पोस्टरवर सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे. 

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? 

अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही. यालाच म्हणतात,  खायचं कुडव्याच आणि गायचं उडव्याचं. एवढा मोठा साक्षात्कार आपल्याला काँग्रेस कडून मुख्यमंत्रीपद उपभोगताना का बर झाला नाही ? सध्या आपल्याला 66 वे वर्ष चालू आहे. वय वर्ष 65 होईपर्यंत आपल्या दोन पिढ्या याच काँग्रेसच्या लाभार्थी राहिल्या. तेव्हा हे तत्त्वज्ञान का सुचलं नाही? असा रोखठोक सवाल अंधारे यांनी अशोक चव्हाण यांना केला आहे. 

आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरचं शहाणपण सुचतंय का?

तसेच, काँग्रेसने दिलेले मुख्यमंत्रिपद त्याचवेळी त्यांच्याच तोंडावर भिरकावून देत हा फलक तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरूपानी हातात का घेतला नाही ? ज्या काँग्रेसच्या नावाने फलक हातात घेतला आहे, त्या काँग्रेसच्याच जीवावर शाळा,  कॉलेज, डेअरी, डाळ मिल, ऑइल मिल,  पेपर मिल, साखर कारखाने, मेडिकल कॉलेज, करोडोचे टेंडर्स, लाभाच्या जागा, पुढच्या पाच-पन्नास पिढ्यांना पुरेल एवढी जायदाद कमवल्यावर आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरचं  शहाणपण सुचतंय का? असंही सुषमा अंधारे यांनी विचारलंय.

"इथे मुद्दा काँग्रेसने काय केलं किंवा भाजपने काय केलं हा असूच शकत नाही. मुद्दा एका तडीपार माणसाकडून बाबासाहेबांच्या संदर्भाने झालेला उल्लेख यावर तुमची काय भूमिका आहे ते आधी सांगा," असे आव्हानच अंधारे यांनी अशोक चव्हाण यांना केलंय.

हेही वाचा :

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?

Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...

Maharashtra Cabinet: देवेंद्र फडणवीसांचा सावध पवित्रा; खातेवाटप कुठे रखडलंय?, महायुतीचं 'राजकीय गणित' आलं समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget