एक्स्प्लोर

अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांनी डाव टाकला; नाना पाटेकरांना उमेदवारीबाबत विचारलं पण...

Shirur Lok Sabha Constituency: शिरूरमधून लोकसभेसाठी आढळरावच उमदेवार असतील, नाना पाटेकरांना विचारलेलं पण, स्वतः अजित पवारांनीच सांगितलं. आता आढळरावांची औपचारिक घोषणा बाकी.

Shirur Lok Sabha Constituency: शिरूर : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीपासूनच शिरूर मतदारसंघ चर्चेत होता. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि त्यांना अजित पवारांनी दिलेलं आव्हान, यामुळे शिरूरकडे अवघ्या राज्याच्या नजरा खिळल्या होत्या. अशातच आता अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात डाव टाकला असून शिरूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा आज सकाळी दिलीप मोहितेंच्या बंगल्यातील बैठकीत मोठी घोषणा केल्याची माहिती मिळत आहे. तसचे, शिरूरसाठी नाना पाटेकरांना विचारणा झाल्याची माहिती खुद्द अजित पवारांनी दिली आहे. 

अजित पवारांकडून शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली जाणार, अशी घोषणा दिलीप मोहितेंच्या बंगल्यातील बैठकीत करण्यात आली. तसेच, नाना पाटेकरांना आपण विचारलं होतं, पण नाना कसा माणूस आहे, हे तुम्हाला माहीत आहेच, त्यांनी नकार दिला, असं अजित पवार म्हणाले. आता शिवाजी आढळराव आणि माझं बोलणं झालंय. ते खासदार झाल्यावर आमदारांच्या कामात अडथळा आणणार नाहीत, त्यामुळे शिरूरमधून आढळरावच उमदेवार असतील, असं अजित पवारांनी थेट सांगितलं आहे. 

शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीनंतर अमोल कोल्हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे, पाडणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट शड्डूच ठोकला होता. तेव्हापासूनच शिरूरवर संपूर्ण राज्याच्या नजरा खिळल्या होत्या. एवढंच नाहीतर या मतदार संघावरुन महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. पण, त्यानंतर शिरूर मतदारसंघ अजित पवारांना सोडण्यात आला. अशातच लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आढळरावांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अजितदादा आढळरावांना तिकीट देऊन शिरूरची बारी मारणार? 

शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटलांवर 2009 आणि 2014 साली शिरूरच्या मतदारांनी विश्वास टाकला. हॅट्रिक मारलेल्या आढळरावांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या घाटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांच्यासोबत बारी झाली. अपेक्षेनुसार कोल्हेंनी बारी मारली. पण कोल्हेंना निवडून आणण्यात अजित पवारांचाचा हात होता. कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केल्याचं अजित पवारांनी जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवलं आहेच. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला निवडून आणलं, त्यालाचा पाडण्याचा चंग अजितदादांनी या निवडणुकीत बांधला आहे. अशातच आढरावांना उभं करुन दादा सध्या शिरूरमधून अमोल कोल्हेंना पाडणार का? अजितदादा शिरूरची बारी मारणार का? हे येता काळच सांगणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget