एक्स्प्लोर

Sharmila Thackeray : शिवाजी महाराजांचा पुतळा अखंड पोकळ होता, समुद्र किनारी असा पुतळा कोण उभं करतं? शर्मिला ठाकरेंचा संताप

Sharmila Thackeray, मुंबई : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील राजकोट (Rajkot Fort) किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा अवघ्या 9 महिन्यांत कोसळ्यात आला आहे.

Sharmila Thackeray, मुंबई : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील राजकोट (Rajkot Fort) किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा अवघ्या 9 महिन्यांत कोसळ्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता, असा दावा केलाय. तर विरोधी पक्षांकडून या घटनेला राज्य सरकारला जबाबदार धरलं जात आहे. दरम्यान, याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. 

पडलेला पुतळा जो दाखवत आहेत, तो अखंड पोकळ पुतळा होता

प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करता, निदान छत्रपतींना तरी सोडा, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा बनवण्यात आलेला पुतळा आतून पोकळच होता. पोकळ पुतळा कोणी समुद्र किनारी उभं करत का? महाराजांनी बांधलेले गड-किल्ले आजही तसेच आहेत आणि 8 महिन्यांमध्ये यांनी बांधलेला पुतळा कोसळला, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. पडलेला पुतळा जो दाखवत आहेत, तो अखंड पोकळ पुतळा होता. असा पोकळ पुतळा समुद्र किनारी कोण उभं करत? असा सवालही शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. 

छत्रपतींनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अजूनही उभा आहे

पुढे बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, छत्रपतींनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अजूनही उभा आहे. किंवा त्यांचे इतके गड-किल्ले आहेत, प्रतापगड धरा किंवा रायगड धरा. तटबंदी का असेना पण ती अजूनही उभी आहे. त्याच्यापेक्षा जास्त वारा ही तटबंदी सोसते. पण मला दु:ख वाटतं. तुम्ही कमीत कमी छत्रपतींना तरी सोडा. मुंबई-नाशिक रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. इतके खड्डे आहेत. मुंबई-गोवा महामार्गाबाबत आम्ही आंदोलन करुन थकलो. कोकणचे लोक काय रक्ताचे आहेत? ते अजूनही या लोकांवर विश्वास ठेवतात, असं मतही शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं. 

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुरुवारी (दि.29) सलग दुसऱ्या दिवशी किल्ल्यावर फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ही फॉरेन्सिक टीम कोल्हापूरवरुन आली आहे. या टीमकडून सध्या घटनास्थळाची पाहणी केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

MLA Rohit Pawar on Shivaji Maharaj Statue : वारेSS व्वाSS सरकार! शिवरायांचा पुतळा 2.40 कोटींचा अन् तात्पुरत्या हेलिपॅडसाठी 2.2 कोटींचा खर्च! आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellery Shop Robbery : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलंMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaPrataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखलABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
Embed widget