आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोमवारी (23 सप्टेंबर) चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता चिपळूणमधील सावरकर मैदानात ही जाहीर सभा होणार आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोमवारी (23 सप्टेंबर) चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता चिपळूणमधील सावरकर मैदानात ही जाहीर सभा होणार आहे. पक्ष निरीक्षक बबन कनावजे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात शरद पवारांची ही सभा होणार आहे. शेखर निकम यांनी पक्षांतर केल्यानंतर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार चिपळूण येत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी कोकणचा दौरा करणार आहेत.
पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांची कोकणात सभा
सोमवारी सकाळी 11 वाजता शरद पवार यांची चिपळूणमधील सावरकर मैदानात ही सभा होणार आहे. पक्ष निरीक्षक बबन कनावजे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून प्रशांत यादव हे एकमेव उमेदवार आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती बबन कनावजे यांनी दिली. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांची कोकणात सभा होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील 1 दिवसीय कोकण दौरा
दरम्यान, शरद पवार यांच्या जाहीर सभेपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील 1 दिवसीय कोकण दौरा होणार आहे. अजित पवार हे 21 सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर असणार आहेत. चिपळूणमध्येच अजित पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे. अजित पवार यांच्यानंतर दोनच दिवसात शरद पवार यांची देखील कोकणवारी होणार आहे. शरद पवार हे 23 आणि 24 तारखेला दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार कोकणात आढावा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दौरे, संवाद, बैठका सुरु आहेत. तसेच इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार दोन दिवस कोकण दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या कोकण दौऱ्यान राजकीय वातावरण गरम होणार असल्याची चर्चा राजकीय वरर्तुळात सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या: