एक्स्प्लोर

मानसपुत्र दिलीप वळसेंच्या मतदारसंघात आज शरद पवारांची तोफ धडाडणार, कोणत्या शब्दात समाचार घेणार ? 

Maharashtra Politics Sharad Pawar : दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांची तोफ आज धडाडणार आहे.

Maharashtra Politics Sharad Pawar : दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांची तोफ आज धडाडणार आहे. दिलीप वळसे पाटील यांना शरद पवारांचे मानसपुत्र मानले जायचे. पण अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांच्या विरोधात जात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. शरद पवारांनी कोर्टात जाण्यासोबतच लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आंबेगावमध्ये शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागलेय.

कोणत्या शब्दात समाचार घेणार ? 

मंत्री दिलीप वळसे पाटील हे आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेले. मात्र आज त्याच वळसे पाटलांविरोधात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. आज थेट वळसेंच्या मतदारसंघात पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. अशारितीने वळसेंना पराभूत करण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकलेत. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यावर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पवार आंबेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शरद पवार त्यांच्या मानसपुत्राचा कोणत्या शब्दात समाचार घेतात, याकडे केवळ मतदारसंघाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असेल. मंचर मधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत. कर्जत जामखेडला इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवण्याच्या तयारीत रोहित पवार आहेत. असा आरोप करत वळसे पाटलांनी अजित पवारांसोबत भाजपशी घरोबा केला होता. त्या आरोपाला रोहित पवार प्रतिउत्तर देतात का? हे पाहणं ही महत्वाचं असेल.

"वादा तोच, पण दादा नवा" रोहित पवारांच्या फोटोसह फ्लेक्स झळकला 

"वादा तोच, पण दादा नवा" या आशयाचे फ्लेक्स पुण्यातील आंबेगाव तालुक्यात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित दादांची जागा रोहित पवारांनी घेतली. असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे-नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेरावांनी हा फ्लेक्स झळकवला आहे. यामुळं बरीच चर्चा मात्र रंगलेली आहे. रोहित पवारांच्या फोटोसह "वादा तोच, पण दादा नवा"हे फ्लेक्स झळकले आहेत. त्याच भागात आज शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि स्वतः रोहित पवार सुद्धा या सभेला उपस्थित असतील. आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेलेले मंत्री दिलीप वळसेंचा पराभव करण्यासाठी ही मोर्चेबांधणी सुरुये.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 :  Nirmala Sitharaman : अर्थ बजेटचा : Superfast News : 01 Jan 2025 : ABP MajhaUnion Budget 2025 : टॅक्स स्लॅबमधील बदलांमुळे सरकारचा 1 लाख कोटींंचा महसूल घटणारABP Majha Headlines : 3 PM : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : TOP Headlines 3PM 01 February 2024Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Embed widget