एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास ढासळल्यानं धर्माच्या आधारे टीका: शरद पवार

महाराष्ट्रात 700  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कांद्यावर बंदी, कापसावर बंदी, साखरेवर बंदी सगळ्याच गोष्टीवर बंदी...नेमके काय चालले आहे? असा संतप्त सवाल शरद पवारांनी केला,

मनमाड : पंतप्रधान मोदींनी (PM Modi)  आत्मविश्वास गमावलाय त्यामुळे ते धर्म जात याविषयावर बोलत आहेत अशी टीका शरद पवारांनी (Sharad Pawar)  केली आहे. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी पार्टी काँग्रेसमध्ये (NCP)  विलीन होतील अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.  दिंडोरी लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ  नाशिकच्या मनमाड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  

शरद पवार म्हणाले, हा देश लोकशाहीला मानणारा आहे.  मोदींची भूमिका बोलायची एक अन् करायची  एक आहे . मोदी सत्ता आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या. समाजातील लहान घटकांना आणखी लहान करण्याच्या प्रयत्न या सरकारने केला आहे. 

मोदींचे सरकार हे फसवे सरकार : शरद पवार 

 शरद पवार यांनी कृषी खात्याचे मंत्री होते तेव्हा काय केले असा सवाल करत आहेत, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात 700  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कांद्यावर बंदी, साखरेवर बंदी सगळ्याच गोष्टीवर बंदी...नेमके काय चालले आहे. कष्टाने पिकवलेले  बाजारपेठात गेले तर शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील. त्याचा संसार फुलेल.  मोदी म्हणतात गरीबांना फुकट धान्य देता.,.. कांदा निर्यातबंदीचा प्रश्न महत्वाचा होता पण केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली नाही. मोदींचे सरकार हे फसवे सरकार आहे. यांच्यवर विश्वास ठेवता येणार नाही.

कांद्याची निर्यात बंदी मी उठवली आहे : शरद पवार

नरेंद्र मोदी म्हणतात शरद पवार यांनी कृषी मंत्री असतांना देशात काय केले ? मी 2004 मध्ये कृषी मंत्री झालो तेव्हा अन्नधान्य आयात करावे लागले अशी स्थिती होती 2014 मध्ये देश अन्नधान्य स्वयंपूर्ण होता. मी कांद्याची निर्यात बंदी उठवली, शेतकरी कर्जमाफी केली आणि विचारात शरद पवारांनी काय केले, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर 

मोदी म्हणतात मी 80 टक्के लोकांना मोफत धान्य दिल, मात्र हे अन्नधान्य पिकवत कोण? याचे श्रेय  शेतकऱ्यांचे आहे, याचे श्रेय जुन्या सरकारचे आहे आणि आम्हाला विचारात काय केले ? असे म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींना उत्तर दिले आहे.  

Video :

हे ही वाचा :

Sharad Pawar: लाचारी करावी, पण त्यालाही मर्यादा असते; जिरेटोपावरून एका वाक्यात शरद पवारांचा प्रफुल पटेलांवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
Embed widget