(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar on PM Modi : 'मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले तरी..' देश काय सांभाळतील टीकेला शरद पवारांचं मोदींना जोरदार प्रत्युत्तर
Sharad Pawar on PM Modi : शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही, तर ते देश काय सांभाळतील या पीएम मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
Sharad Pawar on PM Modi : मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले, तरी मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मागील 56 वर्षांपासून काम करीत आहे. दिसत सध्याच्या घडीला एक तरी असा माणूस दाखवावा, असे आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. पंतप्रधान मोदी यांनी दिंडोरीमील जाहीर सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर आता शरद पवार यांनीही जोरदार पलटवार केला आहे.
मागील 56 वर्षांपासून काम करीत आहे
शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही, तर ते देश काय सांभाळतील या पीएम मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले तरी मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मागील 56 वर्षांपासून काम करीत आहे. दिसत सध्याच्या घडीला एक तरी असा माणूस दाखवावा असे आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
दिंडोरी जाहीर सभा कांद्यामुळेच सर्वाधिक चर्चेत
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरी लोकसभेची जाहीर सभा कांद्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली. गेल्या सहा महिन्यांपासून मोदी सरकारने केलेली निर्यातबंदी आणि त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर निर्यातबंदी उठवल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे मोदींच्या दिंडोरीमधील जाहीर सभेत एका तरुण शेतकऱ्यांने कांद्यावर बोला, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर त्या तरुण शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते.
मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी
या तरुण शेतकऱ्याचे शरद पवार यांनी कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, मोदींना कांद्यावर बोला, असे तरुण शेतकऱ्याने प्रश्न विचारला तर ते योग्य आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र, तो माझ्या पक्षाचा असल्यास तर त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी यांना कांद्यावर बोला म्हणणाऱ्या तरुणाचे कौतुक केले.
इतर महत्वाच्या बातम्या