होय, देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता; शरद पवार स्पष्टच बोलले, निवडणूक आयोगावरही चिडले
भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांनी उपराष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होतं आहे. त्यासाठी, आमच्या बैठका झाल्या असून आम्ही सुदर्शनजी यांचा फॉर्मही भरला आहे. सत्ताधारी पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला होता. त्यानंतर, आम्ही सगळ्यानी मिळून दोन ते तीन नावाची चर्चा केली, त्यानुसार सर्वांचं एकमत झालं. जे उमेदवार सत्ताधारी पक्षांने दिले आहेत, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला फोन केला. एनडीएचे उमेदवार सी. राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, म्हणून सहकार्य करावे अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, मी शक्य नाही म्हटलं, कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर, भाजपच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या प्रमुखांना फो केला होता. भाजपच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ती विनंती अमान्य केली आहे. याबाबत, आता शरद पवारांनी माहिती दिली. शरद पवारांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांच्या अटकेचा दाखलाही दिला. सोरेन हे राज्यपाल यांना भेटायला गेले असता एजन्सीने त्यांना अटक केली. त्यावेळी, हे राजभवन आहे मला बाहेर अटक करा असे सोरन सांगत होते. असे हे उमेदवार, ज्यांच्या राज्यभवनात मुख्यमंत्र्यांना अटक होते, सत्तेचाही दुरुपयोग आहे, असे म्हणत एनडीए आघाडीच्या उमेदवारांवरही शरद पवारांनी टीका केली.
सत्ताधारी एनडीए आघाडीची संख्या जरी जास्त असली तरी आम्ही ते बघू, पण मुख्यमंत्र्याच्या विनंतीवर मी कळवलं मला शक्य नाही. खासदार संजय राऊतांशी बोलणं झालं, त्यांचीही चर्चा झाली. त्यावेळी, त्यांनीही कळवलं की त्यांचा आणि आमचा निर्णय एकच आहे. आम्ही आमचं बघतो, त्यांनी काय करायचं ते ते ठरवतील. निकाल वेगळा लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत व्यक्त केला.
राहुल गांधींच्या बिहार यात्रेचं कौतुक
आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी आपण पाहिलं 300 खासदार रस्त्यावर उतरले, आम्हाला अटक केली. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा गौरव सुरू आहे, बिहार आर्थिकदृष्या अडचणीचं राज्य आहे, त्याचे काही प्रश्न असतील. मात्र, राजकिय दृष्ट्या ते राज्य जागरूक आहे. आणीबाणीच्या काळात पहिला संघर्ष बिहारमध्ये झाला, असे म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींच्या बिहारमधील यात्रेचंही कौतुक केलंय.
निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही - पवार
निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. मात्र, त्यांनी त्यांची जी भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नाही, असे म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाकडून आमची फार काही अपेक्षा नाही, राहुल गांधींनी हे सर्व सत्य समोर आणलं, मात्र याची सुरूवात बिहारमधून झाली. राहुल गांधी यांच्या माहितीत एका झोपडपट्टीत एका घरात 140 लोकं राहत आहेत, असेही पवारांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
शिर्डीतील मंदिरात बैलपोळा उत्साहात; साईचरणी भाविकाकडून सोन्याचे कडे अर्पण, किंमत किती?























