Sharad Pawar on Jayant Patil : करेक्ट कार्यक्रम करण्याची जबाबदारी आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आहे : शरद पवार
Sharad Pawar on Jayant Patil, कोल्हापूर : गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक डायलॉग संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालाय.
Sharad Pawar on Jayant Patil, कोल्हापूर : गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक डायलॉग संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालाय. "टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच", असं म्हणत जयंत पाटील यांनी सातत्याने विरोधकांना आव्हान दिलंय. आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच याबाबत भाष्य केलं आहे. "आणखी किती जणांचा कार्यक्रम होणार", असा प्रश्न कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, करेक्ट कार्यक्रम करण्याची जबाबदारी आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आहे.
View this post on Instagram
शरद पवार म्हणाले, आपलं सगळं आयुष्य समाजातील दलित,आदिवासी, दुष्काळग्रस्त आणि कष्टकरी या वर्गाच्यासाठी ज्यांनी घालवलं हे करताना नव्या पिढीच्या समोर, सर्वसामान्यांच्या समोर एक आधुनिक वैचारिक दृष्टिकोन मांडण्याच्यासाठी अखंड प्रयत्न ज्यांनी केले त्या भारत पाटणकरांचा सन्मान करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्हा लोकांचं आणि त्यांचं काही गोष्टींच्या संदर्भामध्ये सतत चर्चा करून अतिशय जवळीक निर्माण होण्यासाठी बदल केले. त्यांनी महाराष्ट्राच्या विशेषतः दुष्काळी भागातल्या लोकांच्या महत्त्वाचा प्रश्नांच्यासंबंधी अत्यंत बारकाईने अभ्यास करून, लोकांना संघटित करून राज्य सरकारला या सगळ्यांवरची धोरणही बदलायला लावण्यासंबंधीचा आग्रह हा त्यांनी सातत्याने ठेवला. त्याचे सुपरिणाम आज या ठिकाणी काही ठिकाणी बघायला मिळतायत. सांगलीसारखा जिल्हा , जत,आटपाडी यासारखा भाग, खटाव तालुक्याचा, अशी काही भाग असे काही परिसर आहेत. एकेकाळी सर्वसामान्य माणसाला दोन वेळेच्या अन्नासाठी संकट निर्माण करणारी अशी भीषण परिस्थिती केवळ मर्यादित पाण्याच्या अभावामुळ त्यांना त्याठिकाणी करायला लागत होती. त्यांच्या जीवनात बदल कसा करता येईल या प्रकारची आग्रही भूमिका पाटणकरांनी सातत्याने केली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कधी कधी गंमत वाटते, हा सगळा भाग प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सतत जागरूक राहणाऱ्या अशा प्रकारचा आणि कष्ट करून जगण्याच्या संबंधीची साधन उपलब्ध करण्याची काळजी घेणारा अशा प्रकारचा हा परिसर आहे. एक काळ या भागामध्ये दुष्काळ हा विषय पाचवीला पुजलेला होता. जगायचं साधन नव्हतं पण लोकांच्यात हिंमत होती. काय वाट्टेल ते करणार. एक दिवशी मी दिल्लीमध्ये होतो. सकाळी तिथं मराठी भाषिक भेटायला येतात, अन्य भाषिक भेटायला येतात. आणि एक दिवशी काही लोकं आली भेटायला. मराठी होते. त्यांना विचारलं, कुठनं आलात? तर त्यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यातील जत आटपाडी तालुक्यातून आलो. म्हणलं इथ काय चाललंय? म्हणले इथं आमची सर्कस आहे. म्हणल सर्कस? हो म्हणले. दुष्काळामध्ये वाईट परिस्थितीमध्ये जगायचं कसं याची चिंता एकेकाळी होती, तेव्हा आमच्या बापजाद्यानी सर्कशीचा उद्योग काढला. आणि त्याचं नाव भगवान माळी असं काहीतरी नाव घेतलं. भगवान माळीनी पहिली सर्कस काढली. आणि जे लोक आले होते भेटायला ते सांगत होते की तिकडे दुष्काळ आहे. जगायचं कसं हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही सुद्धा या सर्कशीच्या रस्त्याने गेलो आणि त्या ठिकाणी या टोकावरून त्या टोकावर, वाघाच्या तोंडात हात घालतो, आणखी काही काही चमत्कार दाखवतो,या सगळ्या गोष्टी मला दोन तीन सांगत होते. मला कौतुक याचं वाटतंय की या भागातला माणूस संकटावर मात करण्याच्यासाठी काहीही करेल.
इतर महत्वाच्या बातम्या