(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सवालही पैदा नही होता! अजित पवारांसोबतचे लोक आले तर पक्षात घेणार का? शरद पवारांचं क्लिअरकट उत्तर
Sharad Pawar on Ajit Pawar Group : अजित पवार गटाने जुलै 2023 मध्ये शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश आले.
Sharad Pawar on Ajit Pawar Group : अजित पवार गटाने जुलै 2023 मध्ये शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश आले. त्यामुळे अजित पवारांसोबतचे बरेच नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांसोबतचे नेत्यांना घरवापसी करु वाटली तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर 'सवालही पैदा नही होता', अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. यशवंतराव सेंटर मुंबई येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
देशातील लोकशाही वाचवण्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने मोठा वाटा उचलला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील लोकशाही वाचवण्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने मोठा वाटा उचलला. महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. त्या जनतेचे मी आभार मानतो. ही निवडणूक 2 महिने लांबली होती. प्रचंड मोठ्य धनशक्तीच्या विरोधात आम्हाला लढावं लागलं. ज्या चौकशी करणाऱ्या संस्था आहेत, त्यांचाही गैरवापर करण्यात आला. राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील संदेश पाठवला आहे. कोणत्याही समाजाला गृहित धरता कामा नये. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याला यश आले नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. मी पवार साहेब आणि उद्धवजींचे आभार मानतो, त्यांनी जोरदार प्रचार केला, असंही चव्हाण म्हणाले.
शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी एकच गोष्ट सांगितली जायची मोदीं की गॅरेंटी. ती गॅरेंटी काय खरी दिसत नाही. ते नाणं चालतयं असं दिसत नाही. त्यामुळे गॅरेंटीचा विश्वास दिला पण ती गॅरेंटी प्रत्यक्ष कृतीत येत नाही हे चित्र आज याठिकाणी आहे. यातून मार्ग काढावा लागेल. हा मार्ग काढण्यासाठी एकजुटीने चार महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलं काम चोख करू. तुमच्या गावात एक पोल असतानाही ऐंशी टक्के मतदान तुम्ही लोकांनी केलं. ही साधी गोष्ट नाही. त्यामुळे आता पुढे काय करायचं हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही करुनच दाखवता. चार महिन्याच्या निवडणुकीतही तुम्ही असच कराल आणि तिथेही तुतारीचे राज्य येईल. राज्य आल्यानंतर आता सांगितलेल्या गोष्टींवर मार्ग काढले जातील.
इतर महत्वाच्या बातम्या
आरएसएसने म्हटलं अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, आता शरद पवार म्हणाले...