एक्स्प्लोर

Rohit Pawar: 'देवाभाऊ'च्या जाहीरातीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'देवा तूच सांग'च्या जाहिरातीने प्रत्त्युत्तर; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Rohit Pawar on Devendra Fadnavis: आम्ही बेनामी जाहिरात करत नाही, जे करतो ते खुल्लमखुल्ला करतो. असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या देवा भाऊ जाहिरातीवरून टोला लगावला आहे.

Rohit Pawar on Devendra Fadnavis नाशिक : आम्ही बेनामी जाहिरात करत नाही, जे करतो ते खुल्लमखुल्ला करतो. असे म्हणत आमदार रोहित पवार (Rohit Pawar यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या देवा भाऊ जाहिरातीवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी हातात वृत्तपत्र दाखवत फडणवीसांना रोहित पवारांनी टोला लगावला आहे. यापूर्वी देखील रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्राने राज्यभरात बॅनरच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातीवरून टीका केली होती. अशातच देवा भाऊंच्या टीकाले आता 'देवा तूच सांग' च्या जाहिरातीने उत्तर देण्यात आल्याची चर्चा आहे.

'देवाभाऊ'च्या जाहीरातील 'देवा तूच सांग'च्या जाहिरातीने प्रत्त्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विविध दैनिकांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा कायदा, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये, युवकांना नोकरी आणि असुरक्षित महिला यांसारख्या प्रश्नांवरून सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहेत. “देवा तूच सांग” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार, असा सवाल करण्यात आला आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. उद्या, सोमवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. लोकमत, सकाळ, दिव्या मराठी, गावकरी, देशजोश यांसारख्या दैनिकांमध्ये या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. हा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येत आहे.

आम्ही स्वयंघोषित देवाला याबाबत बोलत नाही- रोहित पवार

आमच्या पक्षाने दिलेली जाहिरात आहे. आम्ही स्वयंघोषित देवाला याबाबत बोलत नाही. आम्ही आमच्या देवाबाबत विठ्ठलाला साकडे घातले आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापलं नव्हतं. आमची जाहिरात बघा आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही. याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? कारण 190 कोटी रुपये त्यांचे माफ झाले आहेत. कोकणात दादांच्या पक्षाच्या नेत्याने जाहिरात लावली आहे. भविष्यात ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत. महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो. कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजप सोबत जास्त जवळीक झाली आहे. दादांचे पोस्टर कमी देवाभाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले असल्याचा आरोप हि रोहित पवार यांनी केलाय.

हेही वाचा

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget