एक्स्प्लोर

Sharad pawar: प्रकृती अस्वास्थतेमुळ शरद पवारांचे सर्वच कार्यक्रम रद्द, पुण्यातील सभाही होणार नाही

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शरद पवार बैठका आणि सभांच्या नियोजनात व्यस्त असल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीची मोट बांधताना अनेकदा बैठकांसाठी तेच केंद्रबिंदू राहिले आहेत.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे पायाला भिंगरी लावल्यागत निवडणूक प्रचारात फिरत होते. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात त्यांनी महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या. या सभांसाठी हजारो किमींचा प्रवास त्यांनी गेल्या काही दिवसांत केला आहे. तर, प्रत्येक सभेत जाहीर भाषणही (Election) केली. आपल्या भाषणातून शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केलाय. मात्र, या सभांच्या व दौऱ्यांच्या धावपळीचा ताण आल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. 

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शरद पवार बैठका आणि सभांच्या नियोजनात व्यस्त असल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीची मोट बांधताना अनेकदा बैठकांसाठी तेच केंद्रबिंदू राहिले आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने काँग्रेसची समजूत घालण्याचं किंवा महाविकास आघाडीत सुवर्णमध्य साधण्याचं काम शरद पवारांनीच केलं आहे. त्यानंतर, लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी ते पहिल्या टप्प्यापासून कामाला लागल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी आपला घसा बसल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही प्रचारसभा घेत त्यांनी पुढेही अनेक ठिकाणी सभा केल्या आहेत. या निवडणूक दौऱ्यांचा व सभांचा ताण पडल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ होऊन त्यांना आरामाची गरज आहे. म्हणूनच, त्यांचे उद्याचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांचे उद्या 6 मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या दिनांक 6 मे रोजी कात्रज येथील नियोजित सभाही रद्द करण्यात आली असून याची सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचंही सांगण्यात आलं आहे. 

बारामतीच्या सभेतही कातर आवाज

दरम्यान, शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभा घेतली. मात्र, येथील सभेतही त्यांनी मोजून 4 ते 5 मिनिटांचच भाषण केलं. येथील सभेतून बोलतानाही त्यांचा आवाज कातर होत होता. घसा बसल्याने शब्द नीट फुटत नव्हते. तरीही लेकीसाठी बापाने सभा घेऊन बारामतीकरांना आवाहन केलं. त्यावेळी, बारामतीकरांनीही महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार..  शरद पवार.. अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर, आता शरद पवारांचे उद्याचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा

घसा बसला, शब्द फुटंना, तरीही लेकीसाठी बापाची सभा; शरद पवारांच्या भाषणानंतर बारामतीकरांची घोषणाबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिंदे साहेब मुख्यमंंत्री नको, हे म्हणणारे पहिले नेते अजित पवार,तटकरे : राऊतTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Embed widget