एक्स्प्लोर

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईला वेग; राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले असताना या प्रकरणा बाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले असताना या प्रकरणा बाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता कारवाईला वेग आला असून हे हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेनंतर आता या प्रकरणाच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिल म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत कोल्हे वकिल म्हणून काम पाहणार असल्याची माहिती पुढे आली आहे.      

धनंजय मुंडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेवरुन धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र काल झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवारांना पत्र देत केली मागणी 

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून मागणी हकालपट्टी करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज अजित पवारांना पत्र देण्यात येईल. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर बारामतीमध्ये काल (दि.21) शोक सभा तसेच घटनेचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एकमताने हा ठराव मंजूर करून उद्या अजित पवारांना धनंजय मुंडे यांना अटक करावी, अशा मागणीचे पत्र देण्यात येणार आहे. गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
Eknath Shinde Shivena: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा व्हायरस पसरला, युवासेनेच्या कार्यक्रमात शिंदेंच्या खास माणसालाच डावललं, स्टेजवर बोलावलंच नाही
शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा व्हायरस, युवासेनेच्या कार्यक्रमात शिंदेंच्या खास माणसालाच डावललं, स्टेजवर बोलावलंच नाही
Sanjay Raut on PM Narendra Modi: 'मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय', पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, 'काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेले...'
'मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय', पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, 'काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेले...'
Jayakumar Gore: योग्यवेळी ऑपरेशन होईल अन् त्याचे परिणामही दिसतील; सोलापुरातील ऑपरेशन टायगरवर पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया, विकास लवांडे यांनाही सुनावलं
योग्यवेळी ऑपरेशन होईल अन् त्याचे परिणामही दिसतील; सोलापुरातील ऑपरेशन टायगरवर पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया, विकास लवांडे यांनाही सुनावलं

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Embed widget