एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, मनोज जरांगे, पंकजा मुंडे आणि प्रकाश सोळंकेंनी कोणती मागणी केली?

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटत आहेत.

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आरोपींना ताब्यात घेऊन शिक्षा देण्यात यावी यासाठी रस्ता रोकोही करण्यात आला होता. या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भेट दिली. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जरांगेंनी केली होती. त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले होते. दरम्यान, आता या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. 

संतोष पंडितराव देशमुख

वय 45 वर्ष रा मस्साजोग ता केज जि बीड.

राजकीय कारकीर्द

2012 ते 2017  उपसरपंच
2017 ते 2022     सरपंच
2022 ते आजपर्यंत.  सरपंच

सरपंच देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करा; आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी

बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर आज आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत. आणि सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात एसआयटी स्थापन करा अशी मागणी सोळंके यांनी केली आहे.

मस्साजोग येथील सरपंचाचा खून आणि परळीतील तरूण व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. जिल्हयात घडणाऱ्या अशा घटनां विषयी आ. पंकजाताईंनी चिंता व्यक्त केली असून याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत : पंकजा मुंडे 

मस्साजोग ता. केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांचा खून  झाल्याची घटना नुकतीच घडली. त्याचप्रमाणे परळी येथील तरूण व्यापारी अमोल डुबे यांचं काल रात्री काही लोकांनी अपहरण करून लूटमार केली याबाबत माहिती प्राप्त झाली . या दोन्ही घटनांबरोबरच जिल्हयात अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीमद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी करून आ. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयात अशा घटना घडत आहेत याबद्दल संताप व्यक्त केला आहे . याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

आरोपींना तात्काळ अटक करावी, बजरंग सोनवणे यांची मागणी 

संतोष देशमुख हे मस्साजोग येथील महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. दुपारी अज्ञात काही व्यक्तींनी त्यांचं अपहरण केले होते. संतोष देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीचे जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान ग्रामस्थांनी केज पोलीस ठाण्यात गर्दी केली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या मस्साजोग परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget