शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिलं याबाबत अभिनंदन; संजय राऊत यांचा खोचक टोला
Maharashtra News: शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. तसेच, अजित पवारांना दिलेल्या क्लिनचीटलाही अण्णा हजारेंनी विरोध दर्शवला आहे.
Sanjay Raut on Anna Hazare: मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत (Shikhar Bank Scam Case) अण्णा हजारे (Anna Hazare) जागे झाले, यांबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर टीका केली आहे. तसेच, अण्णा हजारेंनी महाराष्ट्रातील सर्व घोटाळ्यांवर आवाज उठवावा, शिंदे आणि अजित पवारांच्या फुटीवरही आवाज उठवावा, असंही खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. तसेच, अजित पवारांना दिलेल्या क्लिनचीटलाही अण्णा हजारेंनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात बोलतानाच संजय राऊतांनी अण्णा हजारेंवर खोचक टीका केली आहे.
"शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे जागे झाले, यांबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, याबाबत मी अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिलं याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. पण या राज्यात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये घोटाळेच घोटाळे झाले आहेत. अण्णांनी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या घोटाळ्यावर अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन जी खंडणी गोळा केली जातेय, त्यावरही अण्णांनी बोलायला पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना अण्णांना खूप काम आहे. फक्त शिखर बँक घोटाळा बघू नका, राज्यात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. त्यांनी रामलीला मैदानात बसावं, आम्ही त्यांच्यासोबत असू, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढणार?
शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार आहेत. अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत, निषेध याचिका दाखल करण्यास हजारे आणि जाधव यांच्या वकिलांना वेळ दिला असून 29 जूनला होणार पुढील सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना दिलीय क्लीनचीट दिली आहे.
पाहा व्हिडीओ : Sanjay Raut On Anna Hazare: अण्णा हजारेंनी सर्व घोटाळ्यांवर आवाज उठवावा : संजय राऊत