एक्स्प्लोर

Sanjay Raut : ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Sanjay Raut On Ashok Kharat : रुपाली चाकणकर या सॉफ्ट टार्गेट आहेत, पण अशोक खरातला बळ देणारे मंत्रिमंडळात बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सहआरोपी करावे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

नवी दिल्ली : राज्यात ऑपरेशन टायगर सोबत ऑपरेशन तुतारी राबवून ठाकरेंच्या सेनेसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही खासदार भाजपकडून फोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ठाकरेंचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. ऑपरेशन तुतारी राबवण्याआधी अशोक खरातच्या (Ashok Kharat) ऑपरेशन मुतारीचं काय करणार हे आधी सांगा, असा प्रश्न संजय राऊत यांनी भाजपला विचारला. तसेच राज्यात सुरू असलेल्या एकमेकांविरोधातील जादूटोण्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार असंही राऊतांनी विचारलं. 

संजय राऊत म्हणाले की, "ऑपरेशन मुतारीमुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री अडचणीत येणार आहेत. हे ऑपरेशन मुख्यमंत्र्यांनी काही उगाच सुरू केलं नाही, त्यांच्या हाती काही मजबूत गोष्टी लागल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये राजकीय गोष्टी अघोरी पद्धतीने केल्या जात आहेत, एकमेकांवरती जादूटोणे सुरू आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र ही जादूटोण्याची राजधानी होईल की काय अशी भीती आहे." 

खरातला बळ देणारे मंत्रिमंडळात बसलेत

देवेंद्र फडणवीस म्हणतात, या प्रकरणामध्ये राजकारण करू नका. मात्र ते स्वतः राजकारण करत असल्याची टीका संजय राऊतांनी केली. ते म्हणाले की, "या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला, कारण त्या सॉफ्ट टार्गेट होत्या. पण त्या खरातला बळ देणारे हे त्यांच्या मंत्रिमंडळात बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सहआरोपी करावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशा बुवाबाजींना राजकारणात आणण्याच्या गोष्टी केल्या."

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संवेदनशील असायला हवी. कुणाला तरी वाचवण्याची भूमिका त्यांची नसावी. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सातत्याने खरातकडे जात होते, त्याला बळ देण्याची भूमिका त्यांची होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील भक्तांबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं संजय राऊत म्हणाले. 

वारकरी संप्रदायालाही राजकारणात ओढलं

अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचा वापर फक्त आदिवासी आणि इतर समाजाविरोधात करणार का? उलट मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळात बसणाऱ्या भक्तगणांवर या कायद्याचा वापर करावा अशी मागणी राऊतांनी केली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संघटनांना या बुवावाजीचा नाद आहे. या आधी वारकरी संप्रदाय राजकारणापासून बाजूला होता. पण आता वारकरी संप्रदायालाही आता मतांच्या राजकारणासाठी संघाने राजकारणात ओढलं असा आरोप राऊतांनी केला. 

ऑपरेशन टायगरवर काय म्हणाले? 

राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असून त्या माध्यमातून ठाकरेंच्या खासदारांना फोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारण्यात आल्यावर संजय राऊत म्हणाले की, "खासदार नाराज आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवर. विरोधी पक्षांच्या खासदारांना एक रुपयाचाही निधी दिला जात नाही, त्यामुळे विरोधी पक्षांचे खासदार सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत."

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Rathod : वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget