![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर पाहणीसाठी गेले पण गाडीतून पाऊलही बाहेर टाकलं नाही, शेतकऱ्यांच्या अंगावर वसकन ओरडले : संजय राऊत
Sanjay Raut on Dhananjay Munde : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधीच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील नुकसानीची पाहणी केली. यावरून संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
![कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर पाहणीसाठी गेले पण गाडीतून पाऊलही बाहेर टाकलं नाही, शेतकऱ्यांच्या अंगावर वसकन ओरडले : संजय राऊत Sanjay Raut criticizes Dhananjay Munde after inspecting the agricultural damage caused by rain in Marathwada Maharashtra Marathi News कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर पाहणीसाठी गेले पण गाडीतून पाऊलही बाहेर टाकलं नाही, शेतकऱ्यांच्या अंगावर वसकन ओरडले : संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/05/9a092df7059431a8415b095f1bb397291725518908436923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मागील काही दिवसात महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rains) थैमान घातल्याने मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भात (Vidarbha) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली अनेक पिकं डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याने बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर पकडले आहे. युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काल परभणीच्या पथारी तालुक्यात शेती पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. तर आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधीच कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीदेखील नुकसानीची पाहणी केली. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर केल्यावर सर्वांना जाग आली. कृषी मंत्री कोठे होते? या राज्याला कृषीमंत्री आहे की नाही? आदित्य ठाकरे येणार आहे हे कळल्यावर राज्याचे कृषीमंत्री गेले ते गाडीतून उतरले सुद्धा नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी पाय देखील जमिनीला लावला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
कृषीमंत्री शुद्धीत आहेत का?
ते पुढे म्हणाले की, शेतकरी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे काही मागण्या करायला गेले तर शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री ओरडत राहिले. मी काय करू, मी तुमच्या शेतातील काम करू का? हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले. पंचनामे नाही, पिक विमा योजना नाही, तुमच्या यंत्रणा चालत नाही. कृषीमंत्री शुद्धीत आहेत का? तुम्ही कृषीमंत्री आहात. जबाबदारी कुणाची आहे. सर्वांचा पंचनामा काल आदित्य ठाकरेंनी केला आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका
शेतकऱ्यांच्या संदर्भात काल तुम्ही जी वागणूक केलेली आहे. ती मराठवाड्यातील शेतकरी कधीही विसरणार नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अभिमानाने मी गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करणार, असे सांगितले. गडचिरोलीत खाण उद्योग आहेत. तिकडचे आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावे, यासाठी गडचिरोली जिल्हा त्यांनी स्वतःकडे ठेवला आहे. वेगवेगळे कलेक्टर्स नेमले आहेत. आजही आदिवासी जगण्यासाठी संघर्ष करत आहे. येथे आरोग्य व्यवस्था नाही, रस्ते नाही, शाळा नाही. आदिवासींचा विकास झालेला नाही. आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)