एक्स्प्लोर

Sanjay Raut Book Narkatla Swarg: बाळासाहेब ठाकरेंनी अमित शाहांना कसं वाचवलं?; संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

Sanjay Raut Book Narkatla Swarg: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचं उद्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

Sanjay Raut Book Narkatla Swarg: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचं उद्या (17 मे) 'नरकातला स्वर्ग' (Sanjay Raut Book Narkatla Swarg) या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. मात्र या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच एबीपी माझाच्या हाती हे पुस्तक लागलं आहे. या पुस्तकात संजय राऊतांनी आजवर त्यांनी आधी नं मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी लिहिल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे या पुस्तकातील “राजा का संदेश साफ है' हे प्रकरण. 

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर मोठे उपकार केल्याची कहाणीही या पुस्तकात आहे. गुजरात दंगल प्रकरणात सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लागला असताना, तसंच तडीपारीची कारवाई झाली असताना, बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शाहांना संकटाच्या गर्तेतून कसं बाहेर काढलं हे सांगणारी आणि हा दावा करणारी ही कहाणी आहे. आता संजय राऊतांनी आपल्या ह्या कहाणीत केलेल्या दाव्याबद्दल नक्की अमित शाह आणि भाजपकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

पुस्तकात नेमकं काय म्हटलंय?

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचे सरकार होतं... मोदी विरुद्ध केंद्र असा झगडा सुरू होता... गोधराकांडात सीबीआय अनेक चौकशींचा ससेमीरा लागला होता. या दरम्यान गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृह राज्यमंत्री अमित शाह यांना तुरुंगात जावे लागले होते. चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली... नरेंद्र मोदी यांना अटक होईल असे वातावरण तेव्हा निर्माण झाले होते. यावेळी त्यांची राजकीय मतभेद असतील पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असे परखड मत शरद पवारांनी एका कॅबिनेटमध्ये व्यक्त केले होते. शरद पवारांच्या या भूमिकेला अनेकांनी मूक संमती दिली होती आणि त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले ? असा सवाल या या पुस्तकात राऊत यांच्याकडून विचारण्यात आला आहे. अमित शाह हे एका खून प्रकरणात आरोपी होते... त्यानंतर तडीपारही केले त्यांना जाणून देण्यास सीबीआयचे विशेष पथकाचा विरोध होता... त्या पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते त्यांचा तर शहांना जामीन देण्यास पराकोटीचा विरोध होता. या सगळ्यांमध्ये त्यावेळी मोदी यांनी पवारांना विनंती केली आणि पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली शहा यांना एका प्रकरणात जामीन मिळाला मात्र मग अमित शाह पुढे पवाराने महाराष्ट्राशी कसे वागले? असे पुस्तकातून विचारण्यात आलं. 

बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कशाप्रकारे मदत केली?

या पुस्तकात पुढे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेली मदत त्याची विस्तृत माहिती संजय राऊत यांनी मांडली. संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता... परंतु ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिला. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली. अमित शाह यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केली. अमित शाह गुजरातच्या दंगली नंतर प्रचंड अडचणीत होते.. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआय कडे सोपवला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शाह यांना मदत करता येत नव्हती... अमित शाह गुजरात मधून तडीपार होतेच... सीबीआयने फास आवळल्याने अमित शाह यांच्या  तात्पुरत्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अडचणीत अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शाह यांना कोणीतरी सुचवले. एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळ उतरले आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते बांद्राच्या दिशेने निघाले. मात्र मातोश्रीच्या आणि कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याने कलानगरचे मुख्य गेटवरच अमित शहा यांना अडवून ठेवण्यात आले. कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती. दुसऱ्या दिवशी अमित शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर आले... यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शाह हे मातोश्रीवर गेले. 

अमित शाहांची दर्दभरी कहानी आणि बाळासाहेबांचा एक फोन-

गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी रोमांचक कहानी शिवसेनाप्रमुखांना सांगितले . "मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे तडीपारी आहे वगैरे.." अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं... त्यानंतर अमित शाह बाळासाहेब यांना म्हणाले." आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे... तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत" त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून अमित शाह यांचे प्रकरण ज्यांच्याकडे होते त्यांना फोनवरून बोलले आणि त्यांचे शेवटचे "तुम्ही कोणतेही पदावर बसलेले असा पण तुम्ही ही हिंदू आहात हे विसरू नका"..बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शाह यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासतल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या... त्यामुळे त्यानंतर अमित शाहा यांनी पुढे काय केलं हे साऱ्या जगाने पाहिलं आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी ते  निर्घृणपणेचं वागण्याची भावना या पुस्तकातून संजय राऊत यांनी व्यक्त केली. ईडी कोठडी संपून न्यायालय कोठडी म्हणजे आर्थर ऊर्जेच्या दिशेने जाताना संजय राऊत आणि हे सगळं आठवड्याचं  या पुस्तकात सांगितलं.

नरकातला स्वर्ग या पुस्तकांत नेमका कोणता दावा केलाय?

- गुजरात दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता

- अमित शाह तरूण होते आणि त्यांची दाढी काळी होती

- फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शाहांना कुणीतरी सुचवलं.

- लहान जय शाहाला घेऊन अमित शाह मुंबईत पोहोचले

- कलानगरच्या मुख्य गेटवरच शाहांना अडवून ठेवण्यात आलं.

- अमित शाह घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते

- दुसऱ्या दिवशी शाह पुन्हा मातोश्रीवर पोहोचले.

- शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली.

-गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय, अशी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना सांगितली.

- अमुकतमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी माहिती बाळासाहेबांना दिली.

- ''मी काय करू?'' बाळासाहेबांनी विचारलं.

- ''आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे'', शाह म्हणाले.

- बाळासाहेबांनी चिरूटाचा झुरका मारला, धूर सोडला, त्यानंतर एक महत्त्वाचा फोन केला.

- अमित शाहांचं प्रकरण ज्यांच्याकडे होते त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेट बोलले.

- बाळासाहेबांचं वाक्य होतं, '' तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा, पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका!''

- एका फोननं अमित शाहांच्या जीवनातल्या, राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या.

- अमित शाहांनी पुढे काय केलं ते साऱ्या जगाने पाहिले.

- शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृणपणे वागले.

संजय राऊतांच्या पुस्तकात अनेक स्फोटक किस्से-

संजय राऊतांच्या पुस्तकात असे अनेक स्फोटक किस्से आहेत. त्यातीलच अजून एक खळबळजनक दावा आहे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत. बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजेच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि अमित शाहांना गुजरात दंगल प्रकरणात कसं वाचवलं, याबाबत नरकातला स्वर्ग या पुस्तकात खळबळजनक दावा केलाय. मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली, तसंच अमित शाहांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोननंतर शरद पवारांनी कशी सूत्र हलवली याबाबतचा हा किस्सा सांगण्यात आला आहे. 

संजय राऊतांनी लिहिलेल्या पुस्तकात खळबळजनक दावे, VIDEO:

संबंधित बातमी:

गृह विभागाचा मोठा निर्णय, पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार; राजपत्र जारी

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget