Sanjay Raut : राज ठाकरेंना उशीराने आली अक्कलदाढ, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
संजय राऊत म्हणाले की, इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कलदाढ आली आहे. भाजप आणि शिवसेनेत काय झाले ते आम्ही दोघे पाहू.
Sanjay Raut : राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन आठवत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कलदाढ आली आहे. भाजप आणि शिवसेनेत काय झाले ते आम्ही दोघे पाहू. यामध्ये आम्हाला तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही.
भोंग्याचे काय करायचे, त्यासाठी सरकार समर्थ आहे,
भारतीय जनता पार्टीचा लाऊडस्पीकर काल शिवाजीपर्कात वाजत होता, स्क्रिप्ट त्यांची होती, टाळ्या त्यांच्या होत्या आणि घोषणा देखील त्यांच्या होत्या, आपण याकडे लक्ष नाही दिले पाहिजे, काल मराठी भाषा भवनाचे उद्घाटन झाले, मेट्रोचे उद्घाटन झाले म्हणजे मुख्यमंत्री काम करत आहेत, नेतृत्व करत आहेत त्याच्यावर बोला, तुमच्या भोंग्याचे काय करायचे, यांच्या भोंग्याचे काय करायचे, त्यासाठी सरकार समर्थ आहे,
शरद पवारांच्या चरणात आपण देखील जात होतात?
शरद पवारांनी जातीवाद बसवला, तर त्यात शरद पवारांच्या चरणात आपण देखील जात होतात, सल्लामसलत करण्यासाठी, कशाला आपण टोलेजंग माणसांवर बोलायचं? एवढ्या मोठ्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या देखील स्पॉन्सर्ड आहेत, काल शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता, महाराष्ट्राला एकच कळलं की अक्कलदाढ उशिरा येते अशी टीका राऊतांनी राज ठाकरेंवर केलीय. तसेत देशात असे अनेक वेळा होते, शेवटी बहुमत तयार होते, त्याचवेळी सरकार बनते, युतीचे बहुमत झाले नाही महाविकास आघाडीचे बहुमत झाले, आम्ही खोटे बोलणार यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनले आहे, काल त्यांनी मराठी भाषा भवनाचे स्वागत करायला हवे होते, त्याविषयी काही बोलले नाहीत, कोणी फक्त टीका करायची, यामुळे आहे ते सुद्धा गमावून बसाल असे राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
भाजप शासित किती राज्यांमध्ये अजान बंद केली आहे?
राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाने त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढली, हे आता स्पष्ट दिसते आहे, आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे, राज्यांवर जी संकट येत आहेत त्यांच्याशी लढा द्यायचा आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या घुसखोरी आणि अतिक्रमणाच्या विरोधात लढा द्यायचा आहे आणि हे करत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकवायचा आहे, अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, भाजप शासित किती राज्यांमध्ये अजान बंद केली आहे? मशिदींच्या वरून भोंगे काढून टाकले आहेत, जे कायद्यात बसते, त्यानुसार गृहमंत्री काम करतील,
प्रभाकर साहिलच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले
कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने (NCB) फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साहिल (Prabhakar Sail) याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या बातमीवर संजय राऊत म्हणाले, जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत, ती चौकशी चांगले अधिकाऱ्यांकडून व्हायला हवे आणि मला खात्री आहे, त्यांचा मृत्यू हा संशयास्पदरीत्या झालेला आहे,
काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पक्षाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना, महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्यास साथ दिली नाही, असे सांगितले. उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांना जनता धडा शिकवेल. निवडणुकीच्या निकालानंतरच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन कसे आठवले, असेही राज ठाकरे म्हणाले होते.