एक्स्प्लोर

वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ लोक न जमल्याने मोर्चा रद्द करण्याची आयोजकांवर नामुष्की

पूसद येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा कार्यकर्ते न जमल्याने रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या पुसद येथे आज बंजारा समाजाच्या वतीने वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. संजय राठोड बंजारा समाजाचे नेते असून त्यांना सोशल मीडियावर लक्ष केले जातंय. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यासोब बंजारा समाजाची बदनामी केली जात आहे. त्यासर्व बाबींना प्रतिउत्तर देण्यासाठी आज मोर्चेकऱ्यांनी पुसदच्या वसंतराव नाईक चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, हा मोर्चा कार्यकर्त्यांची गर्दी न जमल्यामुळे रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली आहे.

समाजातील अनेक लोक हे वाशिम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे समन्वय समितीच्या बैठकीसाठी उद्या 15 फेब्रुवारीला एकत्र येणार आहे. त्यादृष्टीने या सर्व प्रकरणात पुढची दिशा ठरणार असताना आज पुसद येथे अर्जुन राठोड या व्यक्तीने कार्यकर्त्यांना घेऊन संजय राठोड यांच्या समर्थनात मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, बंजारा समाजातील अनेक वरिष्ठ मान्यवर यांनी या मोर्चात न जाण्याचा सल्ला मोर्चेकरी यांना खासगीत दिला होता, असेही काहींनी कॅमेरासमोर न बोलता सांगितले.

मोर्चेकऱ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र जे काही झाले त्यावर पोहरादेवी येथील बैठकीत बंजारा समाज समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन पुढची दिशा ठरणार असताना समाजातील वरिष्ठ नागरिक यांचा सल्ला न मानता संजय राठोड समर्थकांनी आज पुसद येथे मोर्चा काढला. त्याच पुसदच्या मोर्चात कुणीच फिरकले नाही. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसुन आले. कालपासून आज दुपारी 12.45 पर्यंत आयोजक मोठा मोर्चा असल्याचे माध्यमांना वारंवार सांगत होते. मोर्चेकऱ्यांपेक्षा मोर्चास्थळावर पोलिसांचीच संख्या मोठ्या प्रमाणात होती. अखेर मोर्चासाठी गर्दी न जमल्याने मोर्चा रद्द करण्याची नामुष्की संजय राठोड समर्थक अर्जुन राठोड आणि मोर्चाचे आयोजक यांच्यावर ओढवली आहे.

आता आम्ही चार लोक पुसद तहसीलदार यांना निवेदन देणार आहोत, असे आयोजकांनी सांगितले. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आहेत, पण त्यांच्यापर्यंत मोर्चाचा मॅसेज पोहोचला नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते जमले नाही, अशी सारवासारव मोर्चेकऱ्यांनी केली. एकप्रकारे पुसद येथील मोर्चाचे आयोजक आणि समाजातील वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक नेते असा गट पडल्याने पुसद मोर्चा रद्द करण्याची नामुष्की आयोजक यांच्यावर ओढवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget