एक्स्प्लोर

Sangeeta Gaikwad: राज्यात भाजपमध्ये 'मेगा भरती' सुरु असतानाच उद्धव ठाकरेंकडून मोठा धक्का; नाशिकमधील गायकवाडांच्या हाती मशाल

Sangeeta Gaikwad: राज्यात भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार प्रवेश सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाने भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का दिला आहे.

Sangeeta Gaikwad: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राज्यात भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) जोरदार प्रवेश सोहळे सुरू असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) भाजपला नाशिकमध्ये (Nashik) एक मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड (Sangeeta Gaikwad) आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड (Hemant Gaikwad) यांनी भाजपचा राजीनामा देऊन आज (सोमवार दि. 20) 'मातोश्री' येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ठाकरे पक्षात प्रवेश केला.

या सोहळ्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आदी नेते देखील उपस्थित होते. मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली, ज्यातून गायकवाड दाम्पत्याचा पक्षप्रवेश हा एक मोठा राजकीय संदेश देणारा ठरला.

Who is Sangeeta Gaikwad: संगीता गायकवाड कोण आहेत?

संगीता गायकवाड या नाशिकमधील प्रभाग क्रमांक 20 येथील माजी नगरसेविका असून, भाजपमध्ये सक्रिय होत्या. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला नाशिकमध्ये धक्का बसला असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

Nashik NMC Election: महापालिका निवडणुकीत रंगणार लक्षवेधी लढत

नाशिक महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नाशिकरोडमधील ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांच्याविरोधात हेमंत गायकवाड हे शिवसेनेच्या (उद्धव गट) तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही लढत नाशिकरोडमध्ये लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Uddhav Thackeray: नाशिकमध्ये मी पुन्हा येईन : उद्धव ठाकरे

या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आज नरक चतुर्दशी आहे, कृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर कोण वेगळं सांगायची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. आता हा प्रवाह सुरु झाला आहे. जे मतचोरी करुन तिकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली आहे. या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसं, अमराठीही एकत्र आले आहेत. कारण कुणालाच हे आवडलेले नाही. संगीता गायकवाड आणि इतर सगळे शिवसेनेत आले मी सगळ्यांच्या देखत तुम्हाला विचारतो तुम्हाला काही खोके वगैरे मिळाले आहेत का? काही धाक दाखवला गेला का? कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं नेभळट असतात. यापेक्षा निष्ठावान सैनिक मला प्रिय आहेत. मी भाजपाच्या सगळ्याच नेत्यांना विनंती करतो आहे आपण कसं विष पोसत आहात याकडे डोळे उघडून बघा. इतिहासात पापाचे धनी म्हणून स्वतःची नोंद होऊ देऊ नका. मी नाशिकमध्ये तसा आधीही येऊन गेलो आहे. पण नाशिकमध्ये मी पुन्हा येईन. त्यावेळी भगवा फडकलेला असला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Nashik News: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून वसुली करू नका, अन्यथा कारवाई होणार; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना कडक आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Embed widget