एक्स्प्लोर

Sandipan Bhumre : संदिपान भुमरे संभाजीनगरमधून इच्छुक, पण स्वतःचा पैठण मतदारसंघ जालन्यात; शिंदेंच्या 'मामा'ची अशीही अडचण

पैठण विधानसभा मतदारसंघ संदिपान भुमरे यांचा बालेकिल्ला असून, पैठण जालना लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या भूमरेंना पैठणकरांचे मतदान मिळवता येणार नाही.

Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये (Mahayuti) छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) अखेर शिंदे गटाकडेच (Shinde Group) असणार असून, पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनाच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, उमेदवारी जाहीर करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमोर एक अडचण निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. कारण संदिपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु असून, पण याचवेळी त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच पैठण विधानसभा मतदारसंघ (Paithan Assembly Constituency) जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) येते. 

महायुतीत संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. अशात शिंदे गटाकडेच हा मतदारसंघ जाणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून संदिपान भुमरे आणि विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भुमरेंना 'मामा तुम्हीच लढा' असे म्हणत एकप्रकारे भूमरेंच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर येत आहे. पण ज्या मतदारसंघातील मतदारांमुळे भुमरे राजकारणात मंत्री पदापर्यंत पोहचले, त्या पैठणच्या मतदारांचे मतदान मात्र जालना लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भुमरेंना मोठे कष्ट करावे लागण्याची चर्चा आहे. 

भुमरेंना असा फायदा?

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कन्नड विधानसभा मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, छत्रपती संभाजीनग पूर्व, गंगापूर विधानसभा मतदारसंघ, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अशात वैजापूर,  औरंगाबाद मध्य, पश्चिम हे तीनही मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात आहे. तसेच, पूर्व आणि गंगापूरमध्ये देखील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे याचा मोठा फायदा भुमरे यांना होण्याची शक्यता आहे. 

विनोद पाटलांचे नाव मागे पडले?

संभाजीनगर लोकसभेतून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट मुंबईत जाऊन भेट घेतली. पण मागील आठवड्याभरापासून विनोद पाटील यांचे नाव मागे पडल्याचे दिसत आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे प्रयत्न सुरु असून, शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास विनोद पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar : सकाळी प्रवेश, रात्री थेट उमेदवारी; संभाजीनगरमध्ये एमआयएमला शह देण्यासाठी आंबेडकरांची खेळी

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
Embed widget