Rupali Patil : नाराजी अन् ओबीसींवर अन्यायावर रुपाली पाटलांची छगन भुजबळांना विनंती; म्हणाल्या, 'पक्षातील नेत्यांशी चर्चा...'
Rupali Patil on Chhagan Bhujbal : ओबीसीवर अन्याय केला जातोय हे चित्र दाखवलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे.
पुणे: महायुती सरकारचा रविवारी मंत्रीमंडळ विस्तार पाडला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अनेकांना संधी देण्यात आली आहे. तर अनेक बड्या नेत्यांना डच्चू मिळाला आहे. दरम्यान काही आमदारांना डावलल्याने राज्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने भुजबळ समर्थकांनी राज्यभरात नाराजी व्यक्त केली आहे. काही कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भुजबळ यांचे जे काही आक्षेप असेल ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बोलून सोडवावेत. ओबीसी वर अन्याय केला जातोय हे चित्र दाखवलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्यात रूपाली पाटील
छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा करावी. अजित पवार ओबीसी समाजावर अन्याय करणार नाही सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे अजित पवार आहेत. भुजबळ यांचे जे काही आक्षेप असेल ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बोलून सोडवावेत . ओबीसी वर अन्याय केला जातोय हे चित्र दाखवलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जो काही नाराजीचा सूर आहे. तो पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी बोलून संपवावा. पक्षातील अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोलून बसून चर्चा करणे गरजेचे आहे. जो काही ओबीसींवर अन्याय होतोय असं चित्र दाखवलं जातंय हे अत्यंत चुकीचा आहे. अजित पवार हे सर्व धर्मातील सर्वात जातीतील नेत्यांना एकत्र घेऊन जाणाऱ्या खमकं नेतृत्व आहे. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक यांच्या माध्यमातून ओबीसी मधील अनेक जातीतील प्रत्येक जातीतील समाजातील नेतृत्वाला संधी दिली आहे, असंही रूपाली पाटील यांनी पुढे म्हटलं आहे.
तर मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नक्कीच छगन भुजबळ नाराज असू शकतात, परंतु बड्या नेत्यांची चर्चा करून हा प्रश्न सुटू शकतो. अजित पवारांनी सर्व समाजातील नेतृत्वाला संधी दिली आहे. अजित पवारांनी विधान परिषदेवर छगन भुजबळ यांच्या सुपुत्रांना संधी दिली, त्यांचे पुतणे पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी वरती अन्याय झाला, होतोय असं म्हणणं अत्यंत चुकीचा आहे. मी ही ओबीसी कार्यकर्ता म्हणून छगन भुजबळ यांना विनंती करते. त्यांनी अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे याबाबत चर्चा करावी. नेहमीप्रमाणे प्रत्येक गोष्टींवरती या नेत्यांची संवाद साधतात तसेच आताही संवाद साधावा. त्याचबरोबर ओबीसी बांधवांनी अजित पवारांना जोडे महाराज आंदोलन केलं ते अत्यंत चुकीचे आहे. त्या ओबीसी बांधवांना ताकीत देऊन हे तात्काळ थांबावावं आणि आपला जो काही नाराजीचा विषय आहे तो ज्येष्ठ नेत्यांशी बोलून सोडवावा ही विनंती आहे, असं रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.