एक्स्प्लोर

BJP & RSS: भाजपची संघासमोर शरणागती, विधानसभा प्लॅनिंगच्या प्रत्येक बैठकीत RSS चा प्रतिनिधी, मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Politics: येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता मुंबईतील 36 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढेल

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव जाणवला होता. त्यामुळे भाजपच्या लोकसभेच्या जागांची (BJP Loksabha seats) संख्या 23 वरुन 9 पर्यंत खाली घसरली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपला (BJP) उपरती झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना सामील करुन घेतले जाईल.

विधानसभा निवडणुकीसाठी  संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढेल, असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती निश्चित करण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असेल. 

लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली होती. मात्र, आता संघ विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसोबत मैदानात उतरणार आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बैठकीत काय ठरलं?

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये संघानं भाजपला एक हाती मदत केली. याच मदतीच्या जोरावर भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांचा आकडा 31 वरून 82 पर्यंत वाढला होता.  संघाच्या मदतीमुळे भाजपला मुंबईत 2019च्या लोकसभेमध्ये 3 तर महायुतीला 6 जागांवर विजय मिळाला होता. तर विधानसभा निवडणुकीतही संघामुळे भाजपनं एकट्याच्या जीवावर 16 जागा जिंकल्या होत्या.

मात्र, उर्दू भवनच्या मुद्द्यावरून टोकाचा विरोध असताना ही मुंबईत यामिनी जाधव यांना दिलेल्या उमेदवारीमुळे संघात कमालीची नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत संघाने याच नाराजीमुळे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीला मुंबईत अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. 

लोकसभा निवडणुकीत मुंबईत 3 पैकी 2 हातच्या जागा गमावल्यानंतर भाजपनं संघासमोर शरणागती पत्करली. येत्या निवडणुकीत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देताना संघाने भाजपच्या प्रत्येक स्तरावर हस्तक्षेप करण्याची अट घातली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित असलेल्या विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आणि अशा सर्व आघाड्या आता महायुतीच्या उमेदवारांसाठी छुप्या व उघड पद्धतीनं काम करणार आहेत. 

उमेदवार निवडीमध्ये संघ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. मात्र,  त्याचवेळी अजेंडा राबवताना कुठलीही तडजोड केली जाणार नाही, याचीही खात्री संघाने भाजपला दिल्याचे सूत्रांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा

मविआचं विधानसभा निवडणुकीचं जागावाटप कधी होणार? नाना पटोलेंची महत्त्वाची माहिती, म्हणाले....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget