एक्स्प्लोर

रोहित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रफुल पटेलांचा खोचक टोला, अजित पवारांच्या विधानावरही स्पष्टच बोलले

दिल्लीच्या नेत्यांकडून अजित पवारांवर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दबाव आणण्यात आला होता. तसाच दबाव विधानसभेमध्ये माझ्या मतदारसंघात आणणार आहेत

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बारामतीसंदर्भात केलेल्या विधानावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करणे ही माझी चूक होती, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यावर, आता राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या विधानावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सुप्रिया सुळे यांनी केवळ तीनच शब्दात प्रतिक्रिया देत अधिकचं बोलणं टाळलं. राम कृष्ण हरी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर, आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विधानाचा संदर्भ देत थेट दिल्लीतील भाजप नेत्यांवरच निशाणा साधला. फेसबुकवर मोठी पोस्ट लिहित रोहित पवार यांनी महायुतीतील बिघाडीवर लक्ष्य केलं आहे. आता, त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी रोहित पवारांना खोचक टोला लगावला आहे. 

दिल्लीच्या नेत्यांकडून अजित पवारांवर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दबाव आणण्यात आला होता. तसाच दबाव विधानसभेमध्ये माझ्या मतदारसंघात आणणार आहेत, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते. त्यावर प्रफुल पटेल यांना खोचक टोला लगावला आहे. रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते झालेले आहेत, त्याच्यावर त्यांच्या पक्षांच्या लोकांनी बोललं पाहिजे, असे म्हणत पटेल यांनी रोहित पवारांच्या विधानावर अधिकचं बोलणं टाळलं. खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.

तो अजित पवारांच्या कुटुंबाचा विषय 

लाडक्या बहिणीच्या विरोधात आपल्या बायकोला उभं केलं ही मोठी चूक केली असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर बोलताना प्रफुल पटेल यांनी अजित पवार हे आमच्या राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या मनात जे सुरू होते ते बोलले असतील. मात्र, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न असल्यामुळे मी अधिक बोलणं योग्य नाही, असे पटेल यांनी म्हटले.

विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय

महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लाडकी खुर्ची योजना' आहे, अशी टीका केली होती. त्यावर देखील प्रफुल पटेल यांनी नाना पटोलेंवर पलटवार केला आहे. तुम्ही जितकी टीका कराल, तितकेच लोक तुमच्या विरोधात जातील आणि आमच्या बाजूने उभे राहतील, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. तसेच, लाडकी बहीण योजना ही अत्यंत चांगली व कायमस्वरूपी योजना असून आमच्या विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय, असेही पटेल यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते अजित पवार

राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
Embed widget