(Source: Poll of Polls)
शिरुरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात अजितदादा पार्थ पवारांना उतरवणार? रोहित पवार नेमकं काय म्हणाले
Shirur Lok Sabha constituency : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivaji adhalrao patil) यांना म्हाडा दिल्यानं शिरुर मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Rohit Pawar On Shirur Lok Sabha constituency : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivaji adhalrao patil) यांना म्हाडा दिल्यानं शिरुर मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha constituency) राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आढळराव पाटील यांची महायुतीनं बोळवण केल्याच्या चर्चेला जोर धरला. त्याचवेळी शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून पार्थ पवार (Parth Pawar) अमोल कोल्हेंच्या (Amol kolhe) विरोधात उभं राहणार, या चर्चेला सुरुवात झाली. यावर आता आमदार रोहित पवार यांनीही मत व्यक्त केलेय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार आज आंबेगावमध्ये आले आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना पार्थ पवारांबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की पार्थ पवार शिरुरमधून निवडणूक लढवू शकता. त्यामुळे पार्थ पवारांच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पार्थ पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून आपलं नशीब अजमावलं होतं.
रोहित पवार काय म्हणाले ?
प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात. आता अमोल कोल्हे यांच्याविरोधात पार्थ पवार ही असू शकतात. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही. " दरम्यान, महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील शुरुर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता, तो दावा आजही कायम आहे. पुढील काही दिवसांत महायुतीमध्ये जागावटपाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कुणाला किती जागा याबाबत समोर येईल.
बारामतीमध्ये सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही - रोहित पवार
बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या, त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी लढत होणार आहे, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असे रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांना टोला -
अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. पण ते सध्या ते स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलतात, असा टोलाही यावेळी रोहित पवार यांनी लगावला. त्याशिवाय युगेंद्र पवार म्हणत असतील 'शरद पवार साहेब तसं', म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या बच्चाला हे कळतंय, साहेबांना साथ देण्याची गरज आहे, असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला.
Maharashtra Politics : बारामतीमध्ये अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या शरद पवारांच्या ताफ्यात!