एक्स्प्लोर

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय?; रोहित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: आम्ही गृहमंत्री आणि हवाई उड्डाण मंत्री यांच्याशी संपर्क साधला आहे आणि आमच्याकडे असणारे पुरावे त्यांना सादर केले आहेत, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) पहिल्यांदाच एक महत्त्वाची अधिकृत माहिती समोर आली आहे. विमानाच्या दोन्ही रेकॉर्डरवर भीषण आगीमुळे उच्च तापमानाचा दुष्परिणाम झाला असला तरी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश आलं आहे. एएआयबीने यायबाबत अधिकृत माहिती दिली. संबंधित विमानात दोन रेकॉर्डर होते. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरनं नुकसान झालंय. आता कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचा सखोल तांत्रिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरच्या कंपनी प्रतिनिधीची मदत मागितली आहे. तसंच ज्या देशात विमान बांधणी झाली आहे, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधीकडूनदेखील मदत मागण्यात आलीय. त्यामुळे तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवा, असं आवाहन एएआयबी या तपास ब्युरोनं केलंय. या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही गृहमंत्री आणि हवाई उड्डाण मंत्री यांच्याशी संपर्क साधला आहे आणि आमच्याकडे असणारे पुरावे त्यांना सादर केले आहेत. आम्हाला आशा आहे याचा वापर होईल, असं रोहित पवार म्हणाले. (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)

गृहमंत्री अमित शाह यांनी वेळ दिला नाही- रोहित पवार (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)

आम्ही आमच्या पातळीवर तपास केला. त्यातील अनेक गोष्टी खऱ्या असल्याचं समोर येत आहे. आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वेळ दिला नाही, कारण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत नव्हते. त्यामुळे त्यांचं काम अमित शाह करत असतील, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. उद्या आणखी एक पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. बरेच महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत, असंही रोहित पवारांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 

अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय? (Sunetra Pawar And Parth Pawar On Ajit Pawar Plane Accident)

सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचं अपघातावर काय म्हणणं आहे?, असा प्रश्न रोहित पवारांना एबीपी माझाशी बोलताना विचारण्यात आला. यावेळी अपघात झाल्यानंतर याबाबत पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशी माझी चर्चा झाली होती. आता 13 दिवस झाल्यानंतर ते त्यांचं राजकारण करत आहेत. आम्ही आमचं समाजकारण करत आहोत. अजित पवारांच्या तेराव्या नंतर मी त्यांना भेटलो नाही, असं रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवार काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Ajit Pawar Plane Crash Black Box मोठी बातमी: ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती; आता पुढे काय?

Ajit Pawar Plane Crash: दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget