एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash Black Box मोठी बातमी: ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती; आता पुढे काय?

Ajit Pawar Plane Crash Black Box: अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास तीन आठवडे पूर्ण होत आले आहेत. या अपघाताच्या प्राथमिक अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

Ajit Pawar Plane Crash Black Box: अजित पवार यांच्या विमान अपघाताला (Ajit Pawar Plane Crash) जवळपास तीन आठवडे पूर्ण होत आले आहेत. या अपघाताच्या प्राथमिक अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र ज्या ब्लॅक्स बॉक्सच्या आधारे हा तपास होणार आहे, तो जळालेल्या अवस्थेत असल्यामुळं तपासात मर्यादा येत असल्याचं समोर आलं होतं. त्यासाठी हा ब्लॅक बॉक्स आता परदेशी पाठवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याचदरम्यान एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोने एक महत्वाची माहिती दिली आहे. (Ajit Pawar Plane Crash Black Box Update Marathi News)

विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा (आगीचा) दुष्परिणाम झाला आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहेत. ज्या देशात विमान बांधणी झाली आहे, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून या प्रकरणी मदत मागितली आहे, अशी माहिती एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोने दिली आहे. त्यामुळे आता या ब्लॅक बॉक्सचं पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Ajit Pawar Plane Crash Black Box)

ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? (Ajit Pawar Plane Crash Black Box)

प्रत्येक विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये दोन अत्यंत महत्त्वाची उपकरणं असतात

1. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR)

- हे उपकरण विमानाच्या तांत्रिक हालचालींची नोंद ठेवतं, जसं की,

- विमानाची गती (Speed)

- उंची (Altitude)

- इंजिनची स्थिती

- पायलटने दिलेले कंट्रोल इनपुट्स

- ऑटो-पायलट चालू/बंद स्थिती

अपघाताच्या काही सेकंदांआधी विमानामध्ये नेमकं काय झालं याचा अचूक डेटा यात साठवलेला असतो.

2. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)

- हा भाग पायलटांच्या कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो, त्यामध्ये

- पायलट आणि सह-पायलट यांच्यातील संभाषण

- एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा (ATC) संवाद

- अलार्म्स, चेतावणीचे आवाज

- अपघाताआधीची गडबड, तणाव किंवा गोंधळ

- ही माहिती अपघाताच्या मानवी चुकांची (Human Error) शक्यता तपासायला फार महत्त्वाची ठरते.

अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू- (Ajit Pawar Plane Crash)

अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानानेसकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. (Ajit Pawar Death) लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, VIDEO:

संबंधित बातमी:

Sunil Tatkare On Rohit Pawar: अजित पवारांचा घातपात, रोहित पवारांचा संशय; सुनील तटकरे म्हणाले, माझं नाव कुठे...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget