एक्स्प्लोर

महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर बंदी येणार, 105 आमदारांच्या सह्यांचे पत्र; मुख्यमंत्र्यांची संमती, लवकरच निर्णय

आ.रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे.

मुंबई : सणा-सुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे, कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे  तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील (Rohit patil) यांनी  निवेदनाद्वारे केली. या मागणीला 105 आमदारांच्या सहीसह पाठिंबा पत्र जोडत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) हा विषय महत्त्वाचा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच  फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री  पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे मंत्री गोगवले यांनी देखील शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, असे म्हटले आहे. 

आ.रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांमुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे. द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते. या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

105 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र

दरम्यान रोहित पाटील यांनी प्लॅस्टिक फुलावर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीला विधिमंडळातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल 105 आमदारांनी  स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर प्लास्टिक फुलांमुळे गंभीर परिणाम होत आहे.  ही महत्त्वाची बाब आमदार रोहित पाटील यांनी लक्षामध्ये आणून दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन मंत्री  भरत गोगावले व  पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या विषयावर  तातडीने बैठक घेण्याचे  आश्वस्त केले आहे.

कृत्रिम फुलांवर बंदी आणणार

शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, आम्ही सीएमसोबत मिटींग असून त्यात हे ठरले आहे. कृत्रिम फुलांमुळे शेतकरी वर्गाला फटका बसतो पण त्याचवेळी रासायनिक कलर वापरणेही यामुळे थांबेल, असे भरत गोगावले यांनी सांगितले आहे. आमदार महेश शिंदे यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत हा मुद्दा चर्चेला आणला होता. त्यावर, हा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा

आमदाराने 5 वेळा फोन करुनही उचलला नाही; दिव्यांग आयुक्तांचे थेट विधानसभेतून निलंबन, सभापतींची कारवाई

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मृतदेह सापडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
Marriage Letter to Sharad Pawar: अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ
नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना भवनजवळील ते बॅनर काढले; यशवंत किल्लेदारांनी स्पष्टच सांगितले
राज ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना भवनजवळील ते बॅनर काढले; यशवंत किल्लेदारांनी स्पष्टच सांगितले
Faridabad’s Al-Falah University: विद्यार्थ्यांना MBBS शिकवणारे प्रोफेसर दहशतवादी कटात अन् संपूर्ण अल फलाह विद्यापीठ वादात! विद्यापीठाची स्थापना केली तरी कोणी? कुलगुरु डॉ. भूपिंदर कौर म्हणाले तरी काय?
विद्यार्थ्यांना MBBS शिकवणारे प्रोफेसर दहशतवादी कटात अन् संपूर्ण अल फलाह विद्यापीठ वादात! विद्यापीठाची स्थापना केली तरी कोणी? कुलगुरु डॉ. भूपिंदर कौर म्हणाले तरी काय?
Embed widget