एक्स्प्लोर

Ramdas Athawale: 'आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक लढण्यास....', ईव्हीएम मशीनविरोधात विरोधकांनी केलेल्या टीकेवरती रामदास आठवलेंचं उत्तर

Ramdas Athawale: विरोधकांनी निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM)वर नाही, तर बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी केली होती, त्यानंतर महायुतीतील नेत्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता.

पुणे: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhansabha Election 2024) मध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. महायुतीमध्ये एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने 57 तर राष्ट्रवादी (अजित पवार गट)  काँग्रेसला 41 इतक्या जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला 49 जागांवर विजय मिळवला आहे. राज्यात लागलेले निकाल पाहिल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीतील अनेक विरोधी पक्षांतील नेते निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. त्यानंतर विरोधकांनी निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM)वर नाही, तर बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी केली होती, त्यानंतर महायुतीतील नेत्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता. मात्र, आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक लढण्यास तयार आहोत. निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे, असं रामदास आठवले म्हणालेत. तर निवडणुकीत महायुतीला मोठा यश मिळालं आहे. निवडणुकीत आम्ही संविधान, ईव्हीएम मशीनलामध्ये आणलं नाही , विरोधकांनी आणलं. मात्र, त्याचा फायदा होणार नाही, संविधान बदलाचा प्रचार यंदा चालला नाही. दलितांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं. महायुतीचे सरकार प्रत्येकासाठी काम करणार आहे. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे. 
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास देखील आठवलेंनी व्यक्त केला आहे. 

महाविकासआघाडीचे नेते शपथविधीला अनुपस्थित

काल(गुरूवारी) राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य बडे नेते, खासदार, आमदार, महाराष्ट्रातील आमदार, खासदार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं,, मात्र, काही नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, त्यांच्या मनात मोठा राग आहे. पण आमच्या मनात विकासाची आग आहे. आता ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकारण करतायेत. काल त्यांनी शपथविधीला उपस्थित राहायला हवं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की, आम्हाला  प्रेरणा मिळते स्फूर्ती येते. बाबासाहेबांनी विश्वशांतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दलितांच्या न्यायासाठी आपला देश एक राहिला पाहिजे, प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे. बाबासाहेबांचा मोठा गर्व आणि अभिमान आम्हाला आहे. ज्या रिपब्लिकन पक्षासाठी बाबासाहेबांनी लढा दिला, तो पक्ष पुढे नेण्याची आत्ता माझ्यावर जबाबदारी आहे. बाबासाहेबांना राजकारणात आणू नका. बाबासाहेब देशातील 140 कोटी जनतेचे आहेत, असंही रामदास आठवले पुढे म्हणालेत. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde On PM Modi : मोदींनी देशालाच परिवार मानलं, तुम्ही 'विकासाचे फ्रेंड' आहात; पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट, मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक
मोदींनी देशालाच परिवार मानलं, तुम्ही 'विकासाचे फ्रेंड' आहात; पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट, मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल  
कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल  
Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget