राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी मी शरद पवारांना सल्ला दिला होता : रामदास आठवले
Ramdas Athawale on Sharad Pawar : शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच काँग्रेस पक्षात विलीन करायला हवा होता, मी ज्या वेळेला त्यांच्यासोबत होतो तेव्हा मी हा सल्ला त्यांना दिला होता.
Ramdas Athawale on Sharad Pawar : "शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच काँग्रेस पक्षात विलीन करायला हवा होता, मी ज्या वेळेला त्यांच्यासोबत होतो तेव्हा मी हा सल्ला त्यांना दिला होता. आता त्यांनीच आपलं मत व्यक्त केल्यामुळे भविष्यात पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नक्कीच काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल. पण राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांसारखा जो जेष्ठ नेता आहे. तो कसा काम करेल याबद्दल मला शंका आहे", असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. महायुतीच्या प्रचारासाठी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाण्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी शरद पवारांसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.
रामदास आठवले म्हणाले, ठाणे लोकसभा हा शिवशक्ती भीमशक्तीचा गड आहे. बाळासाहेबांना मिळालेलं धनुष्यबाण आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. 'जय भीम आहे आमच्या गाठीशी, मग आम्ही का राहणार नाही नरेश म्हस्के यांच्या पाठीशी', अशी कविताही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावेळी ऐकवली.
कोणताही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार नाही
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, देशातील कोणताही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार नाही, झाला तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच विलीन होऊ शकेल. अजित दादांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. पवार साहेबांनी अजितदादांना अनेकदा संधी दिलेली आहे. परंतु काही वेळेला त्यांना संधी मिळाली नाही, अशी त्यांनी जी खंत व्यक्त केली आहे. ती योग्य आहे.
नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे नेते आहेत
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, विरोधकांकडे आता कोणता दुसरा मुद्दा राहिलेला नाही? विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत. नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे नेते आहेत, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्याची आदेश दिलेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी संविधानाला डोकं टेकवून शपथ घेतलेली आहे. मोदींनी बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची काम पूर्ण केलेली आहेत जी काँग्रेसच्या काळात झाली नव्हती. नरेंद्र मोदी संविधान बदलण्याचा विषयच येत नाही. जाणीवपूर्वक दलित समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, असं सातत्याने विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. दलितांची मतं आपल्या बाजूने वळवावी या उद्देशाने विरोधक अशा पद्धतीचा प्रचार करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma andhare on Sheetal Mhatre : आशीर्वाद रॅलीत ज्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याच शितल म्हात्रे का? प्रियांका चतुर्वेदींवर टीका केल्यानंतर सुषमा अंधारे संतापल्या