Ramdas Athawale on Chandrakant Patil : निमंत्रण स्वीकारुनही चंद्रकांत पाटलांची कार्यक्रमाला दांडी, रामदास आठवले संतापले, म्हणाले...
Ramdas Athawale on Chandrakant Patil, दिल्ली : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी प्रमुख अतिथी म्हणून उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते.
Ramdas Athawale on Chandrakant Patil, दिल्ली : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी प्रमुख अतिथी म्हणून उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र रामदास आठवले यांचे निमंत्रण स्वीकारून सुद्धा चंद्रकांत पाटील अनुपस्थित राहिले. त्यामुळे रामदास आठवले यांनी स्टेजवरच तीव्र नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी युतीधर्म तोडला असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले, आपल्या दलित समाजातील मुलांनी आणि मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. त्यामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. आज 79 वा स्थापना दिवस यशवंतराव चव्हाण सभागृहात साजरा केला जातोय. पाऊस आज पडतोय, पाऊस पडायलाही पाहिजे. या संस्थेत नेहमी वाद सुरु असतो. प्रत्येकाला आपला अधिकार हिसकावून घेण्याचा अधिकार आहे.
रामदास आठवले म्हणाले, शिक्षणाबाबतच्या मुद्यावर चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वारंवार बैठका झाल्या. चंद्रकांत पाटील यांनी आज कार्यक्रमाला यायला हवे होते. राज्यपाल महोदय इथे आले. डॉ. आंबेडकरांच्या संस्थेचा स्थापना दिवस आहे. ही चुकीची गोष्ट आहे. आम्ही सरकारला सपोर्ट करत आहोत. यानंतर असा अॅटीट्यूड योग्य नाही. आजच्या कार्यक्रमाला येण्याची चंद्रकांत पाटलांची जबाबदारी होती. मी परदेशात गेलो तरी मी अमेरिकेत असलो तरी आमंत्रण स्वीकारल्यानंतर कार्यक्रमाला पोहोचतो. आम्ही चंद्रकांत पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त करतो, असंही रामदास आठवले यांनी सांगितले.
आठवलेंचा कार्यक्रम टाळून चंद्रकांत पाटील आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यक्रमाला
त्यानंतर कळले की, आठवले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दांडी मारुन चंद्रकांत पाटील आनंदराज आंबेडकर यांनी आयोजित केलेय पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. आठवलेंचा कार्यक्रम टाळून चंद्रकांत पाटील आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. चंद्रकांत दादांनी मैत्रिधर्म युतिधर्म मोडला असल्याची नाराजी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मंदिर पाडकामाच्या मुद्यावरुन चंद्रकांत पाटील सोलापुरात संतापले
मंदिर पाडकामाच्या मुद्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील चांगलेच संतापले होते.मंदिर पाडल्याचा जाब चंद्रकांत पाटील हे फोनवर समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीस विचारतानाही दिसले होते. "मी विद्यार्थी चळवळीतून आलोय, तुम्ही माझा रुप बघितलंच नाही. जिथं जिथं अन्याय होतो तिथं मी आक्रमकपणे मांडतो. सरकारमध्ये असून सुद्धा मांडतो अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. दरम्यान, काल आक्रमक झालेल्या चंद्रकांत पाटलांवर आज रामदास आठवले उपस्थित न राहिल्याने संतापले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या