एक्स्प्लोर

फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया

जे ठरलं होतं त्याचाच मी व्हाट्सअपला स्टेटस ठेवला होता. आता फक्त घोषणा बाकी आहे अशी प्रतिक्रिया माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील (Rajvardhan Patil) यांनी दिली.

Rajvardhan Patil : जे ठरलं होतं त्याचाच मी व्हाट्सअपला स्टेटस ठेवला होता. आता फक्त घोषणा बाकी आहे अशी प्रतिक्रिया माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील (Rajvardhan Patil) यांनी दिली आहे. काल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) खासदार सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आज 11 वाजता हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये ते सर्व गोष्टींची घोषणा  करणार असल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील निवडणुकीआधी शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. काल(गुरूवारी) हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश करण्याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. अशातच आज दुपारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन पाटील हे आज त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन आपला पुढचा राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. मात्र, ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले? 

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्याबाबत आज प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना विचारले. यावेळी शरद पवार म्हणाले की, दुपार पर्यंत काय होतंय बघूया. दुपारी माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला या, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. आज दुपारपर्यंत हर्षवर्धन पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळं हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान. या घडामोडी घडत असतानाच आता इंदापूरातील भाजपा कार्यालयाचे फलक हटवले आहेत. शरद पवार हर्षवर्धन पाटलांच्या भेटीनंतर इंदापुरात घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंदापूर शहरात असणाऱ्या भाजप कार्यालयावरील फ्लेक्स रातोरात हटवण्यात आले आहेत.

 महत्वाच्या बातम्या:

Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध : 8 December 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  8 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 डिसेंबर 2024 : ABP MajhaAshok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Embed widget