Raju Shetti : पंतप्रधान मोदींनी 11 वर्षे परदेशात फिरुन काय केलं? G7 परिषदेतून भारताला डच्चू, राजू शेट्टींची टीका
Raju Shetti on NCP Crisis : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या

Raju Shetti : जून महिन्याच्या अखेर होणाऱ्या G7 शिखर संमेलनाचं भारताला अद्यापपर्यंत आमंत्रण मिळालेले नसल्याचे म्हटलं जात आहे. या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नसली तरी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांची हत्या झाल्यानंतर भारत-कॅनडाचे संबंध बिघडलेले असून ही पार्श्वभूमी यामागे असल्याचे म्हटले जात आहे. आता यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरवेळी अनेक देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. भारताला कमी देशांनी पाठींबा दिला. हे आपल्या परराष्ट्र नितीचे अपयश आहे, नीती चुकली आहे. आपण एकटे पडत चाललो आहोत. 11 वर्ष मोदींनी परदेशात फिरून केले काय? असा सवाल उपस्थित होतोय. अमेरिकेची सर्वात मोठी बाजारपेठ चीन होती.पण, दोन्ही देशात वाद सुरू आहे. त्याचा फायदा आपल्या देशाला घेता आला नाही. आपल्याकडे जे आहे त्याचा फायदा घ्या. उद्योगपतीचा नाद सोडून शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा दिल्या असत्या तर वेगळी परिस्थिती राहिली असती, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
एकत्र राहा, अजून फुटा, काहीपण करा, पण...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाच्या चर्चेबाबत विचारले असता राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील सर्व नेत्यांना हात जोडून विनंती आहे. एकत्र राहा, अजून फुटा, काहीपण करा. पण, राज्याचे वाटोळे अजून करू नका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पहिले दोषी अजित पवार
कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय, असे वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. याबाबत विचारले असता राजू शेट्टी म्हणाले की, 6 मे पासून सातत्याने तीन आठवडे पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्षाची गर्भधारणा होणे अशक्य आहे. डाळींबच्या बाबतीत तसेच आहे. कांदा चाळीतील कांदा खराब झालाय. शेतात असलेला कांदा वाहून गेला. भाजीपाल्याची देखील तीच अवस्था आहे. कृषिमंत्री नाशिक जिल्ह्यातील असताना त्यांनी बेजबाबदार वक्तव्य करणे बंद केले नाही. पंचनामा कसला करावा? असे प्रश्न ते विचारात आहेत, शेतकऱ्यांशी तुलना भिकारीशी केली आहे. अजित पवार म्हणतात मनातले बोलायचे नसते, त्यामुळे अजित पवारांच्या मनात तेच आहे. आता माणिकराव कोकाटे ओसाड गावची पाटीलकी आहेत असे म्हणतात, याचे पहिले दोषी अजित पवार आहेत. त्यांनी शेतीला मोठं बजेट द्यायला पाहिजे होते. ओसाड गावची पाटीलकी आहे, त्याचं नंदनवनमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी कोकाटे, अजित पवारांची आहे. भरीव तरतूद कांद्याला द्यायला पाहिजे होती. लोकांनी केंद्र सरकारला जाब विचारला पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
स्वाभिमानी संघटना निवडणूक लढणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी संघटना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढणार आहे. जिथे कार्यकर्ता मागणी करेल तिथे निवडणूक लढविणार आहोत. आघाडी सोबत जायचे का? हे अद्याप ठरलेले नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा रसातळाला गेलाय
गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल आहे. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली. याबाबत विचारले असता राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा रसातळाला गेला आहे. आधीही पक्षांतर झाले होते, पक्षांतर झाले नाही असे नाही. पण, आता भीती घातली जाते आणि पक्षांतर केले जात आहे आणि कार्यकर्ते खेचले जात आहेत. हे आता बाहेर येत आहे. लोकांना कळू द्या हे काय लायकीचे आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
आणखी वाचा























