Rajni Satav passed awaay : रजनी सातव यांचे निधन, वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Rajni Satav passed awaay : माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड येथील खासगी रुग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी (दि.18) प्रकृती अस्वस्थ असल्याने नांदेड येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
Rajni Satav passed awaay : माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड येथील खासगी रुग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी (दि.18) प्रकृती अस्वस्थ असल्याने नांदेड येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रजनी सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आई आणि विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्या त्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याचे आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषविले होते. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील होत्या.
दिवंगत काँग्रेस नेते राजीवजी सातव यांच्या मातोश्री महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री,राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अॅड.रजनीताई सातव यांचे ह्रदय विकाराने आज दुःखद निधन झाले.आमदार डॅाक्टर प्रज्ञाताई सातव आणि संपूर्ण सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.… pic.twitter.com/KteXiJbFzL
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 18, 2024
काँग्रेसमध्ये गेल्या 40 वर्षांपासून सक्रिय
राज्यमंत्री राहिलेल्या रजनी सातव यांनी एकदा विधानसभेत तर एकदा विधानपरिषदेतून नेतृत्व केलं होतं. काँग्रेसच्या प्रदेश संघटनेतही त्या अनेक वर्ष सक्रिय होत्या. सातव कुटुंबिय गेल्या 43 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहे. सध्या त्यांची सून आमदार आहे. गांधी घरण्याचे निकटवर्तीय, अशी सातव कुटुंबियांची ओळख आहे.
इतर महत्वाच्या बातम्या