Rajan Vichare : एकनाथ शिंदेंना नडणाऱ्या राजन विचारेंची संपत्ती किती? पाच वर्षांत 11 कोटींची वाढ
Rajan Vichare Property : गेल्या पाच वर्षांमध्ये राजन विचारे यांच्या संपत्तीमध्ये जवळपास 11 कोटींची वाढ झाल्याचं दिसून येतंय.
![Rajan Vichare : एकनाथ शिंदेंना नडणाऱ्या राजन विचारेंची संपत्ती किती? पाच वर्षांत 11 कोटींची वाढ Rajan Vichare Property 2024 thane lok sabha election shiv sena uddhav thackeray vs eknath shinde maharashtra marathi news Rajan Vichare : एकनाथ शिंदेंना नडणाऱ्या राजन विचारेंची संपत्ती किती? पाच वर्षांत 11 कोटींची वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/b384c1ca36e8495656504b2fac6d0404171441231074993_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या राजन विचारे (Rajan Vichare) यांना ठाकरेंनी ठाण्यातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राऊंडवर राजन विचारे आता शिंदेंच्या उमेदवाराला लढत देणार आहेत. महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसला तरी राजन विचारे यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे.
राजन विचारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना राजन विचारे यांनी त्यांच्या संपत्तीचं विवरणपत्र दिलं आहे. त्यानुसार राजन विचारे यांच्याकडे जवळपास 26 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं दिसून येतंय.
राजन विचारे यांची संपत्ती किती? (Rajan Vichare Property)
- एकूण संपत्ती - 25,82,97,000
- रोख रक्कम - 1,20,000
- पत्नीकडे रोख रक्कम- 60,000
- जंगम मालमत्ता - 1,32,55,125
- पत्नीकडे जंगम मालमत्ता- 2,40,32,502
- स्थावर मालमत्ता - 5,64,45,503
- पत्नीकडे स्थावर मालमत्ता- 74,56,420
- कर्ज - 3,24,78,888
- पत्नीकडे कर्ज - 94,20,232
- वारसा हक्काने मिळालेली संपत्ती - 16,94,631
- गुन्हे - 6 फौजदारी गुन्हे.
शिक्षण - एफ.वाय.जे.सी
वाहने - राजन विचारे यांच्याकडे हुंदाई वेरणा, पत्नी नंदीनीच्या नावे इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.
शेती - रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.
सदनिका - ठाण्यातील चरई भागातील रोझ वूड, दिघे चौकात दुकान, मिरा-भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान.
पत्नी नंदिनी विचारेंच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान.
राजन विचारे यांची मालमत्ता - (2019 सालची)
- एकूण संपत्ती - 14,59,80,198
- जंगम मालमत्ता - 2,01,15,200
- पत्नी नंदिनी - 2,82,93,363
- रोख रक्कम - 2,00,000
- वारसा हक्काने - 9,00,000
- कर्ज - 4,18,57,461
- गुन्हे - 9 फौजदारी गुन्हे
वाहने - फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंझ,
पत्नी नंदीनीच्या नावे- टोयोटा फोर्चुनर, इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.
शेती - रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.
सदनिका - ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड आणि जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूरनिवासमध्ये दुकान.
ठाण्यात प्रतिष्ठा पणाला
ठाणे लोकसभेचे चित्र पाहता सर्वच आमदार हे महायुतीकडे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे खासदार राजन विचारे यांना निवडणुकीत विजय होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. ही निवडणूक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राजन विचारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)