एक्स्प्लोर

MNS Gudipadwa Melava: राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा ट्रेलर लाँन्च, मोठे खुलासे करणार! एका मिनिटांच्या व्हिडीओमध्ये संकेत!

MNS Gudipadwa Melava: काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिल्लीवारी केली, तेव्हापासूनच मनसे महायुतीत सामील होणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण नेमकं घडतंय काय? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. अशातच राज ठाकरेंनी आता मनसैनिकांना साद घातली आहे.

Raj Thackreay MNS Gudipadwa Melava 2024 : मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. सर्वच पक्षांनी आपपल्याप्रमाणे समीकरणं जुळवून इतर पक्षांसोबत युती केली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) महायुतीत सामील होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. पण अद्याप काही ठोस निर्णय मनसेकडून (MNS) तरी झाल्याचं दिसत नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिल्लीवारी केली, तेव्हापासूनच मनसे महायुतीत सामील होणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण नेमकं घडतंय काय? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. अशातच राज ठाकरेंनी आता मनसैनिकांना साद घातली आहे. मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय, असं म्हणत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय? सर्व सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गुडीपाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लॉन्च केला आहे. "9 तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय... हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे!", अशा कॅप्शनसह राज ठाकरेंनी गुडीपाडवा मेळाव्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 

मनसेसोबतच्या युतीचा महायुतीला फायदा काय? 

भाजप आणि मनसे यांच्यात युतीच्या चर्चा सुरू आहेत. जर युती झाली तर मनसे एक जागा लढवणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.पण यंदाच्या निवडणुकीत चित्र काहीसं वेगळं आहे. कारण संपूर्ण मुंबईवर प्रभुत्व असणाऱ्या शिवसेनेतच फूट पडली आहे. शिवसेनेचे दोन गट झाले. एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट. शिंदेंनी भाजपची साथ दिली, तर ठाकरे महाविकास आघाडीसोबतच राहिले. या फुटीनं राज्याच्या राजकारणाचं गणित तर बदललंच पण त्यासोबतच शिवसेनेचंही समीकरणं बदललं. अशातच मुंबईवर विजय मिळवायचा असेल, तर ठाकरेंना रोखावं लागेल आणि यासाठी महायुतीला मदत होणार मनसेची. कारण संपूर्ण मुंबईत शिवसेनेसोबतच मनसेचं वजनही मोठं आहे. मोठ्या प्रमाणातील मराठी व्होटबँक मनसेच्या बाजूनं आहे. गेल्या निवडणुकीतही मराठी व्होटबँक मनसेनं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ठाकरेंना चितपत करण्यासाठी भाजपनं मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना आखली असल्याचं बोललं जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Embed widget