एक्स्प्लोर

Raj Thackeray Rally : राज ठाकरे यांची तोफ दादरमध्ये धडाडणार, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बीएमसी निवडणुकीचं रणशिंग फुंकणार!

Raj Thackeray Rally : महापालिका निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी सगळ्यांनाच आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवीन वर्षात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत जाहीर सभा होणार आहे. 

Raj Thackeray Rally : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महापालिका निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी सगळ्यांनाच आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मनसेकडूनही (MNS) मुंबईतील समस्यांबाबत आवाज उठवला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नवीन वर्षात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत जाहीर सभा होणार आहे. 

शिवसेनेच्या होम ग्राऊंडवर राज ठाकरेंची पहिली सभा

नवीन वर्षात राज ठाकरे यांची पहिली सभा शिवसेनेच्या होम ग्राऊंडमध्ये होणार आहे. महापालिकेतील प्रमुख पक्षांना टक्कर देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक समस्यांवर राजकीय पक्ष जोरकसपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. यामध्ये मनसेने देखील 'घे भरारी' अभियान राबवत आता मुंबईकरांच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी सुरुवात केलेली आहे. घे भरारी अभियानांतर्गत प्रत्येक वॉर्डात सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या पक्षाची भूमिका मुंबईत दादरमध्ये (Dadar) आता सभा घेऊन स्पष्ट करणार आहेत.

नवीन वर्षात राज ठाकरे यांची पहिली सभा ही दादर विभागात पार पडणार आहे. 22 जानेवारीला सभा घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र जानेवारीच्या शेवटच्या दहा दिवसात सभा होणार आहे.

दादरमध्ये राज ठाकरेंची सभा कुठे होणार?

दादर शिवाजी पार्क मध्ये पहिली सभा घेण्यासाठी मनसे आग्रही आहे. 

तसेच दुसरं शिवसेना भवनसमोर सभा घेण्याची देखील मनसेची तयारी आहे

तिसरा पर्याय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या जवळच्या रस्त्यावर मनसे सभा घेण्याचं नियोजन करत आहे.

मात्र सभा कुठे होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

पक्षाच्या नेत्यांची पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा सुरु आहे

राज ठाकरे काय बोलणार?

राज ठाकरे यांची पहिली सभा आगामी महापालिका दृष्टीने पार पडणार असल्याने ते या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. राज ठाकरे हे या सभेमध्ये मुंबई महापालिका दृष्टीने आपली ब्लू प्रिंट आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारण यावर भाष्य करतील.

आगामी महानगरपालिकाच्या दृष्टिकोनातून मनसेचे दादर-माहिम मतदारसंघातील सात वॉर्डवर राज ठाकरेंचं लक्ष आहे. राज ठाकरे यांची मुंबईतील पहिली सभा ही आगामी महापालिका दृष्टीने मुंबईतील मनसेची भूमिका ही स्पष्ट करणारी असणार आहे.

VIDEO : Raj Thackeray Rally : राज ठाकरेंची नववर्षातील पहिली सभा शिवसेना भवनाच्या दारात? ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget