एक्स्प्लोर

कोणाशीही युती नाही, स्वबळावर 225 ते 250 जागा लढणार, कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार: राज ठाकरे

राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच, हे घडणार आहे, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. ते मुंबईत बोलत होते. 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी रणशिंग फुंकलं.  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच, हे घडणार आहे, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. ते मुंबईत बोलत होते. 

राज ठाकरे काय म्हणाले?

आजच खूप पाऊस पडतोय त्यामुळे अनेक जण येऊ शकले नाहीत. गेले 20 25 दिवस परदेशात होतो. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलावलं होतंम, तिथे इंटरव्हायू झाला. तिकडे एक मुलगा येऊन मला भेटला तो म्हणाला माझ्या हॉटेलला चला, आग्रह केला. मला म्हटला तुमची भाषणे ऐकून लहानपणी प्रेरणा घेतली आणि अमेरिकेत हॉटेल सुरु केलेय. तिकडे जाऊन मी खरंच थक्क झालो.  तिकडे दीड ते दोन तासाचे वेटिंग होते.  असंख्य लोकं मला तिकडे भेटले. 

कॅनडा आणि अमेरिकेत पाच तलाव आहेत, ते अवकाशातून दिसतात, त्यात नायगरा फॉल्स दिसतो. मुबलक पाणी तिकडे असून कागदाचा वापर करतात. आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असूनही वारेमाप पाणी वापरलं जातं. 

राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही गोष्टीत बदल करायला हवा. मराठवड्याचा एक दिवस वाळवंट होईल. बेसुमार जंगल तोड सुरु आहे. 
अनेक हजारो एकारात तोड सुरु आहे. आपल्या काही गोष्टी आपण सुधारणा गरजेचं आहे.  होळी आली की सांगतो जंगल तोड नको. आपण मुळात धर्माकडे पाहिले पाहिजे. लाकडाचा उपयोग स्मशानात होतोय. यात सुधारणा होणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. ज्यांच्याकडे जंगलं आहेत ते लोकं पुरत आहेत. राज्य सरकारने विद्युतस्मशान भूमी वाढवल्या पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणाले. 

लाडकी बहीण-भाऊवर भाष्य  

लाडकी भाऊ आणि बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. माझी सर्वांना विनंती आहे, जिथे पूर आलाय तिथे लोकांना मदत करा.मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते आपलं निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत, असं राज ठाकरे म्हणाले. 

मी काल आढावा घेत होतो. मला कळेना कोण कुठला आमदार आहे. पुढे राजकीय घमासान होईल, इतकं होईल की न भविष्य ना भूतो असेल. मला कळलं आपले लोकं काही कुठे जाणार आहेत तर मीच रेड कार्पेट टाकतो. त्यांचंच खरं नाही तर तुम्हाला कुठे बसवतील? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. 

सर्व्हे झाला, किती जागा लढणार? 

आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे झाला,तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. निवडून येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल. कोणालाही तिकीट दिले जाणार नाही, पैसे काढणाऱ्यांना तिकीट नाही. जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिकपणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. 

सत्तेत बसणारच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकं मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत. काही लोकं हसतील, पण ती गोष्ट घडणारच.  आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोतॉ. कोणतीही युती नाही. 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे. यावेळी मी बैठका घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 

येत्या दोन दिवसात दुसऱ्या सर्व्हेला आपले नेते येतील. निवडणुकीच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे म्हणाले. 

Raj Thaceray Speech Vidhan Sabha : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

संबंधित बातम्या 

Raj Thackeray: राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलं, विधानसभेचा सर्व्हेही झाला, मनसे किती जागा लढणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रि‍पद, रस्सीखेच सुरुच?Zero Hour Jammu Kashmir : जम्मू - काश्मीरमध्ये 370 वरुन घमासान, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल!Zero Hour Bachchu Kadu Parivartan : बच्चू कडू यांचं 'परिवर्तन'! शिंदेंची साथ सोडत तिसऱ्या आघाडीत!Zero Hour Amit Thackeray : Balasaheb Thackeray यांचा आणखी एक नातू निवडणुकीच्या रिंगणात?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
Embed widget