एक्स्प्लोर

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं, युतीची बातमीच देतो; आज राज ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर निघालोय, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान काल माध्यमांशी बोलताना जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. याचदरम्यान राज ठाकरेंनी आज पत्रकारांना गुगली टाकल्याचं पाहायला मिळालं. 

...अन् राज ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर जातोय-

राज ठाकरे जेव्हा जेव्हा पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारतात. तेव्हा ते नेहमी पत्रकारांना गुगली टाकत असतात. आज राज ठाकरे शिवतीर्थवरुन कारमधून निघाले असताना पत्रकारांनी साहेब कुठे दौरा असा प्रश्न विचारला. यावर मातोश्रीवर जातोय, असं मिश्किल उत्तर राज ठाकरेंनी दिलं. त्यानंतर लगेच मी घरगुती कामासाठी बहिणीकडे जातोय, असं राज ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असंही ते म्हणाले. युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.  उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेलं पुढचं पाऊल असल्याची चर्चा आहे. 

राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठकींचे धडाके-

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकींचे धडाके सुरू आहेत. आज मनसेच्या केंद्रीय समितीची पुन्हा बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. 2014 आणि 2017 या निवडणुकानंतर पुन्हा एकदा 2025 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड टिकवायला मनसेप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील ही चर्चा रंगली आहे. सलग तीन दिवसाच्या चर्चेनंतर मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे मराठी माणसाचे गळ घालणारे पोस्टर्स पाहायला मिळत आहे. सोबत दोन्ही नेत्यांच्या मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यासंदर्भात माध्यमांवर चर्चा केली. मात्र प्रत्यक्षात दोनही राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू केली आहे.

मनसेच्या बैठकीत काय काय घडलं?

1. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकींचे धडाके सुरू आहेत. आज मनसेच्या केंद्रीय समितीची पुन्हा बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली.  

2. आजच्या बैठकीत केंद्रीय समिती च्या गटाध्यक्षांसोबत राज ठाकरे यांनी चर्चा केली आहे.

3. केंद्रीय गटाध्यक्षांची जबादारी ही बाळा नांदगावकर यांच्यावर आहे. त्यासोबत मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि इतर केंद्रीय समितीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांनी चर्चा केली आणि आढावा घेतला आहे.

4. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर मनसेने 227 मतदार संघाचा आढावा आणि अहवाल तयार केला आहे तो अहवाल आज राज ठाकरे यांच्या पुढे मांडण्यात आला आहे.

5. या अहवालात काही सकारात्मक मतदार संघ आहेत असेही राज ठाकरे यांच्या समोर मांडण्यात आलेल आहे. नाशिक - मुंबई - पुणे यांना सोडून इतर काही मतदार संघाची रूपरेषा उभारण्यात आली आहे.

6. या मतदारसंघातून आता उपाध्यक्ष आणि गटाध्यक्ष यांच्याकडून आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

7. पहिला राउंड केल्यानंतर आणखी दोन राउंड करण्यात येणार आहे यावेळी नेटव मांडली ही ग्राउंड वर जाऊन लोकांसोबत चर्चा करतील.

8. पुन्हा एखदा मतदार संघांवत चर्चा आणि नवे अहवाल घेऊन आता 13 जूनला गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची बैठक पार पडेल.

9. आज बैठकील बाळा नांदगावकर, कर्णबाळा दूनबळे, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि यशवंत किल्लेदार जी नेते मंडळी उपस्थित होती. 

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: एकीकडे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीची चर्चा; दुसरीकडे राज ठाकरेंनी दुसरा पत्ता उघडला, मनसेच्या बैठकीची Inside Story

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 
ज्यांनी देवाला सोडलं नाही, दानपेटीवर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
ज्यांनी देवाला सोडलं नाही, दानपेटीवर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget