Raj Thackeray Speech : मला जुगार खेळता येत नाही, 5 वर्षातून एकदा जुगार खेळतो, आत गेलो तर भिंगऱ्या भिंगऱ्या फिरवत होते, राज ठाकरे काय काय म्हणाले?
Raj Thackeray Speech , कणकवली, सिंधुदुर्ग : मी पक्षाची स्थापना केली होती, तेव्हा एक उदाहरण दिले होते. आज पुन्हा ते उदाहरण देतो. मी मलेशियाला गेलो होतो
Raj Thackeray Speech , कणकवली, सिंधुदुर्ग : "मी पक्षाची स्थापना केली होती, तेव्हा एक उदाहरण दिले होते. आज पुन्हा ते उदाहरण देतो. मी मलेशियाला गेलो होतो. तिथे जेंटिक हायलंड नावाची एक जागा आहे. आता अनेक लोक गेली असतील. मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे केवळ एक हॉटले होतं. साधारण ते मुंबई ते माथेरान एवढं अंतर होतं. तिथे पोहोचलो. मी सहज आपला चोची मारत होतो. विचारपूस केली. म्हटलं इथे काय आहे? ते म्हणाले इथं कसिनो आहे. त्यानंतर मी संध्याकाळी शर्मिला आणि आमच्या बरोबरचे दोघे तिघे जण खाली कसिनोमध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. 5 वर्षातून एकदा खेळतो. आतमध्ये गेलो तिकडे भिंगऱ्या भिंगऱ्या फिरवत होते. मी 10 मिनीटांत बाहेर पडलो. त्यानंतर मी बाहेर आलो तिकडे एक बार होता. तिथे बसलो", असे मनसे अध्यक्ष राजे ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
तर आपण कोणती संस्कृती घेऊन बसलो आहोत?
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, बारमध्ये बसलो तेव्हा माझं सहज असं वरती लक्ष गेलं. तिथं मोठी पाटी लिहिली होती. त्यावर लिहिलं होतं. मुस्लिमांना परवानगी नाही. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. मलेशिया एक मुस्लिम देश आहे. मी त्यांना विचारलं की हे कशासाठी लिहिलं आहे? मग त्यांनी सांगितलं की मुस्लिम धर्मात दारु पिणे चुकिचे मानतात आणि जुगारही मान्य नाही. मग मी त्यांना विचारले की, तुम्हाला कसं कळतं की, माणूस मुस्लिम आहे? मग त्यांनी सांगितलं की, कायद्याने फक्त पाटी लावली आहे. बाकी आम्ही कोणाला थांबवत नाही. स्वत:च्या देशाची प्रगती करण्यासाठी जर एक देश धर्माला बाजूला करत असेल तर आपण कोणती संस्कृती घेऊन बसलो आहोत, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
ठाकरे म्हणाले,कोकण रेल्वे झाली तेव्हा दलाल फिरत नव्हते. त्यामुळे लवकरच झाली. बाजूचा गोवा पाहा. अख्ख जग तिथं जातं. गोव्यासारख्या बीचवरती जे दिसते ते चित्र जर कोकणात दिसलं तर ट्वेंटी ट्वेंटी सारखी होईल. तेव्हा म्हणतात, आमची संस्कृती खराब होते. इकडंची संस्कृीत खराब होते तर गोवा आणि केरळची संस्कृती वाईट आहे का? असा सवालही राज ठाकरेंनी केला.
नारायण रावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही
राज ठाकरे म्हणाले, खरतर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मी पाठिंबा जाहीर केला, तेव्हा वाटत नव्हतं सभा घ्याव्या लागतील. पण नारायण रावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. नारायण राणे निवडून आलेलेच आहेत. मी तुमच्या टाळ्यासाठी बोलत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील जनता सुजाण आहे. मी अशामुळे म्हणतोय की, महाराष्ट्र राज्याला 9 भारतरत्न आहेत. त्यापैकी 7 भारतरत्न एकट्या कोकणातून जातात. एकट्या दापोलीतील 4 भारतरत्न आहेत, त्यामुळे सुजाण आहेत, असं म्हटलं, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray Speech : कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत, वा रे वा 5 वर्षे यांच्यासोबत सत्तेत होतात, तेव्हा का बोलला नाहीत, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल