एक्स्प्लोर

Vasant More: अमित ठाकरेंनी झापलं, घाव वसंत मोरेंच्या जिव्हारी लागला; मनसे सोडण्यासाठी 'तो' प्रसंग ठरला ट्रिगर पॉईंट

Maharashtra Politics: अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना झापल्यापासून वसंत मोरे नाराज, सोशल मीडियावरील पोस्टनंतर अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना सल्ला.

पुणे: मनसेचे पुण्यातील माजी नेते वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात या गोष्टीचा जोरदार चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांनी पक्ष सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणे मनसेच्या कार्यकारिणीतील नेत्यांना लक्ष्य केले होते. या नेत्यांनी सातत्याने गटबाजी करुन आपल्याला डावलले. या सगळ्याला कंटाळूनच आपण मनसेतून कधीही न परतण्यासाठी राजीनामा देत आहोत, असे वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले होते. परंतु, वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्यासाठी दिलेले कारण म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी महिन्यात घडलेली एक घटना वसंत मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याच्यादृष्टीने ट्रिगर पॉईंट ठरली, असे सांगितले जाते. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना झापले होते. गेल्या 25 वर्षांमध्ये आपल्याला कधी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी झापले नाही, पण अमित ठाकरे (Amit Thackeray) आपल्याला ओरडले, ही गोष्ट वसंत मोरे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळेच वसंत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्का केल्याचे सांगितले जाते.

नेमकं काय घडलं होतं?

वसंत मोरे यांनी अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. एरवीही वसंत मोरे हे सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. परंतु, वसंत मोरे यांनी 27 फेब्रुवारी रोजी लिहलेल्या फेसबुक पोस्टमध्ये मनसेच्या पुण्यातील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला होता. हीच गोष्ट अमित ठाकरे यांना खटकली होती. यावरुन त्यांनी वसंत मोरे यांना, 'सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा', असा सल्ला दिला होता. त्यामुळे वसंत मोरे दुखावल्याचे सांगितले जाते.

वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होतं?

'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अमितसाहेबांचा मला फोन आला होता. ते म्हणले आजचा मोर्चा खूप छान झाला. मला समजलं तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता. पण मला तुम्ही दिसला कसे नाही, भेटला कसे नाही... मी साहेबांना बोललो, साहेब मी तुमच्या अवतीभवती होतो त्याचा हा पुरावा... साहेब मी काम करणारा आहे, नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल. मी तुमच्या मागे अगदी दोनच पावलं चालतो होतो, असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल... अमितसाहेब तुमच्यासाठी काहीपण फक्त मला समजून घ्या', असे वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. 

Vasant More: अमित ठाकरेंनी झापलं, घाव वसंत मोरेंच्या जिव्हारी लागला; मनसे सोडण्यासाठी 'तो' प्रसंग ठरला ट्रिगर पॉईंट

आणखी वाचा

वसंत मोरेंना मुरलीधर मोहोळांचा फोन; वसंत मोरे भाजपात जाणार?

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget