राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, दोन ते तीन गाड्या एकमेकांना धडकल्या
Raj Thackeray's Convoy Accident: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे.

Raj Thackeray's Convoy Accident: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. राज ठाकरेंच्या ताफ्यातील मागील बाजूस असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याचं समजत आहे. यामध्ये अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीचा बोनटचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अहमदनगरच्या पुढे घोडेगाव नजीक गाड्या धडकल्या आहेत. दरम्यान, या अपघाताबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे.
औरंगाबादेत राज ठाकरे यांनी 1 मी रोजी (रविवारी) सभ होणार आहे. ते आज पुण्यातून औरंगाबादसाठी निघाले होते. या प्रवासादरम्यान राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जात आहे. यामध्येच आता अहमदनगर पुढील घोडेगाव नजीक हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर आता पुन्हा राज ठाकरे यांचा ताफा संपूर्ण ताफा मार्गस्थ झाला असून किमान 40 ते 45 मिनिटात औरंगाबादला पोहचेल, अशी माहिती मिळत आहे.
सभेची उत्सुकता शिगेला
महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. ही सभा औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. या मैदानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांची ही सभा ऐतिहासिक असल्याचं सांगण्यात येत आहेत. म्हणूनच या सभेत ते नेमकं काय बोलतील याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
कितीही सभा घेतल्या तरी राज ठाकरे एकापेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकले नाहीत : गुलाबराव पाटील
बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय ; पडळकरांची शरद पवारांवर टीका
'शकुनी काकांचा दोन हजार कोटीची एसटी बँक अन् मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव', पडळकरांचे शरद पवारांवर गंभीर आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
