एक्स्प्लोर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: ... अन् राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सरप्राईज दिलं, मातोश्री भेटीची इनसाईड स्टोरी, नक्की काय घडलं?

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरे हे गेल्या काही वर्षांमध्ये मोजके प्रसंग वगळता मातोश्रीवर आले नव्हते. त्यामुळे आज राज ठाकरे हे मातोश्रीवर येणे हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

Raj Thackeray visits Matoshree: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कोणालाही अपेक्षा नसताना अचानक वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान गाठत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वरळीतील मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीची चर्चा हवेतच विरुन गेली का, असे वाटू लागले होते. परंतु, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी सर्वांनाच सुखद धक्का देत मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

राज ठाकरे हे आज उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. ठाकरेंच्या गोटात कोणीही तशी अपेक्षा केली नव्हती. मात्र, रविवारी सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जायचे, हे ठरवले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरुन संजय राऊत यांना कॉल लावला. 'मी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत आहे', असे सांगितले. संजय राऊत यांनी ही गोष्ट लगेचच उद्धव ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरे दादर परिसरातील आपल्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानावरुन बाहेर पडले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटांत मातोश्रीवर पोहोचले.

Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरेंची गाडी मातोश्रीवर येताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

राज ठाकरे हे उद्धव यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत आहे, ही बातमी बाहेर येताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले. राज ठाकरे यांची गाडी मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर आली तेव्हा त्यांच्या गाडीला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गराडा पडला. हे कार्यकर्ते राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करताना दिसले. इतक्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज यांना घेण्यासाठी गेटच्या बाहेर आले. राऊत हे राज ठाकरे यांना मातोश्रीच्या गेटपर्यंत घेऊन गेले. एरवी उद्धव ठाकरे हे कोणाच्याही स्वागतासाठी मातोश्रीच्या गेटपर्यंत येत नाहीत. मात्र, राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीच्या गेटवर उभे होते. रा ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मिठी मारली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात लालभडक गुलाबांचा मनमोहक पुष्पगुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा

राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल ठेवलं, उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, पण फक्त 20 मिनिटांत राज बाहेर पडले

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Amit Thackeray: 'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget